22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeक्रीडापी. व्ही. सिंधू , लक्ष सेन टॉप-१० मध्ये कायम

पी. व्ही. सिंधू , लक्ष सेन टॉप-१० मध्ये कायम

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : बीडब्ल्यूएफ वर्ल्ड रँकिंग मंगळवारी जाहीर झाली असून जवळपास सर्व स्टार भारतीय शटलर्सला मोठा फायदा झाल्याचे पाहायला मिळत आहे. भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू महिला एकेरीत सातव्या क्रमांकावर पोहोचली आहे. लक्ष सेननेही टॉप-१० मध्ये आपले स्थान कायम राखले आहे. याचबरोबर एच. एस. प्रणॉय आणि किदाम्बी श्रीकांत यांनी पुरुष एकेरी क्रमवारीत प्रत्येकी दोन स्थानांनी झेप घेतली आहे.

दुखापतीमुळे वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि जपान ओपनला मुकलेल्या पी. व्ही. सिंधूला बीडब्ल्यूएफ वर्ल्ड रँकिंगमध्ये एका स्थानाचा फायदा झाला आहे. ज्यामुळे पी. व्ही. सिंधू सातव्या क्रमांकावर पोहोचली आहे तर, लंडन ऑलिम्पिकची कांस्यपदक विजेती सायना नेहवालने तीन स्थानांची झेप घेत टॉप-३० मध्ये स्थान मिळवले आहे.

प्रणॉयने मागील काही महिन्यांत आपल्या खेळात सातत्य राखत दमदार प्रदर्शन केले आहे. ज्याचा फायदा त्याला बीडब्ल्यूएफ वर्ल्ड रँकिंगमध्ये झाला आणि तो १६ व्या स्थानावर पोहोचला आहे.
पुरुष एकेरीत किदाम्बी श्रीकांतला दोन स्थानांचा फायदा झाला आहे. बीडब्लूएफ वर्ल्ड रँकिंगमध्ये तो १२ व्या स्थानावर पोहोचला आहे. तर, लक्ष सेन सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. तो बीडब्ल्यूएफ वर्ल्ड रँकिंगमध्ये टॉप-१० मध्ये असणार एकमेव भारतीय खेळाडू आहे.

पुरुष दुहेरीत चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रँकीरेड्डी हे वर्ल्ड रँकिंगमध्ये आठव्या स्थानावर आहेत. अश्विनी पोनप्पा आणि एन. सिक्की रेड्डी यांची महिला दुहेरीच्या क्रमवारीत २८ व्या स्थानावर घसरण झाली आहे.. तनिषा क्रास्टो आणि इशान भटनागर या मिश्र दुहेरीच्या जोडीने दोन स्थानांची झेप घेत कारकीर्दीतील सर्वोत्तम ३३ व्या क्रमांकावर पोहोचले आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या