24.4 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeक्रीडापी. व्ही. सिंधूची दुसरी कोरोना चाचणी निगेटिव्ह

पी. व्ही. सिंधूची दुसरी कोरोना चाचणी निगेटिव्ह

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : राष्ट्रकुल खेळ सुरू होण्यापूर्वीच भारताला मोठा धक्का बसला होता. रिपोर्टस्नुसार, भारतीय बॅडमिंटन स्टार पी. व्ही. सिंधूमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आली होती. त्यामुळे तिला बॅडमिंटन संघापासून वेगळे करण्यात आले होते. परंतु आता पी. व्ही. सिंधूची दुसरी चाचणी निगेटिव्ह आल्याने तिला कोरोना नसल्याचे निष्पन्न झाले आहे. ही बाब भारतासाठी मोठा दिलासादायक आहे.

नीरज चोप्राच्या दुखापतीनंतर पी. व्ही. सिंधू आणि मनप्रीत सिंग यांना भारतीय संघाचे ध्वजवाहक बनवण्यात आले आहे. प्रत्येक देशासाठी दोन ध्वजधारक असणे आवश्यक असल्याची माहिती आयोजकांनी दिल्याने दुसरा ध्वजवाहक म्हणून मनप्रीतचे नाव जोडले गेले आहे.

दरम्यान, पी. व्ही. सिंधूची दुसरी चाचणी निगेटिव्ह आल्याने तिला कोरोना नसल्याची माहिती आहे. यामुळे तिला गेम्स व्हिलेजमध्ये देखील प्रवेश मिळाला आहे. ही भारतासाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. यामुळे भारताची मोठी चिंता मिटली आहे. आजपासून राष्ट्रकुल स्पर्धा सुरू झाली असून खेळाडूंमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या