22.5 C
Latur
Saturday, November 26, 2022
Homeक्रीडापाकने केला द.आफ्रिकेचा पराभव

पाकने केला द.आफ्रिकेचा पराभव

एकमत ऑनलाईन

अ‍ॅडलेड : पाकिस्तानने पावसाच्या व्यत्यानंतरही सामन्यावरील आपली पकड सुटू दिली नाही. त्यांनी दक्षिण आफ्रिकेचा ३३ धावांनी पराभव करत ४ गुणांसह गुणतालिकेत पाचव्या तिस-या स्थानावर झेप घेतली. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ९ बाद १८५ धावा केल्या होत्या.

मात्र पावसाच्या व्यत्ययामुळे डीएलएसनुसार दक्षिण आफ्रिकेसमोर १४ षटकात १४२ धावांचे आव्हान ठेवण्यात आले. मात्र आफ्रिकेला १४ षटकात ९ बाद १०८ धावांपर्यंतच मजल मारता आली.

पाकिस्तानसाठी दक्षिण आफ्रिकेविरूद्धचा आजचा सामना अत्यंत महत्वाचा आहे. आजच्या सामन्यात पाकिस्तानने खराब सुरूवातीनंतर १८५ धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर दमदार गोलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेची अवस्था ९ षटकात ४ बाद ६९ धावा अशी केली आहे.

मात्र भारत – बांगलादेश सामन्याप्रमाणे आजच्या सामन्यातही दुस-या डावाची पाच षटके उलटून गेल्यानंतर पावसाने व्यत्यय आणाला. त्यामुळे डकवर्थ लुईसचा खेळ पुन्हा एकदा खेळला गेला.

डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे दक्षिण आफ्रिका १५ धावांनी पिछाडीवर होती. डकवर्थ लुईस मेथर्डनुसार ९ षटाकात ८४ धावा करणे आवश्यक होत्या. आफ्रिकेच्या फक्त ६९ धावा झाल्या होत्या. त्यामुळे ते १५ धावांनी पिछाडीवर होते.

दरम्यान, पावसाने उसंत घेतली आणि डीएलएस नुसार सामना १४ षटकांचा करण्यात आला. त्यानुसार दक्षिण आफ्रिकेसमोर १४२ धावांचे आव्हान ठेवण्यात आले. आफ्रिकेने ९ षटकात ६९धावा केल्या असल्याने त्यांना ५ षटकात विजयासाठी ७३ धावांची गरज होती.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या