18.1 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeक्रीडामेलबर्नला पोहोचला पाकिस्तानचा संघ; फायनलसाठी कसून करतोय सराव

मेलबर्नला पोहोचला पाकिस्तानचा संघ; फायनलसाठी कसून करतोय सराव

एकमत ऑनलाईन

मेलबर्न : पाकिस्तानने न्यूझीलंडचा पराभव करत टी-२० विश्वचषक २०२२ च्या अंतिम सामन्यात धडक मारली. पाकिस्तानने सेमीफायनल अर्थात उपांत्य फेरीचा सामना ७ विकेट्सने जिंकला. त्याचबरोबर या विजयासह पाकिस्तानचा संघ फायनल सामना खेळण्यासाठी मेलबर्नला पोहोचला आहे. आता टी २० विश्वचषकाचा अंतिम सामना १३ नोव्हेंबरला मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळवला जाणार असून त्यामुळे पाकिस्तानचा संघ मेलबर्नला पोहोचला आहे.

टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासाठी पाकिस्तान संघ आता सज्ज झाला आहे. नुकतीच टीम पाकिस्तान मेलबर्नला पोहोचली असून बाबर अँड कंपनी शुक्रवारपासून येथे सराव सुरू करणार आहे. अंतिम सामन्यात पाकिस्तानसमोर  इंग्लंडचे आव्हान असणार आहे. दरम्यान नुकताच पाकिस्तानचा संघ इंग्लंडला पोहोचला असून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने खेळाडूंचे एअरपोर्टवरील फोटो शेअर केले आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या