19.8 C
Latur
Monday, December 5, 2022
Homeक्रीडातिस-या सामन्यात होणार पंतची हकालपट्टी ?

तिस-या सामन्यात होणार पंतची हकालपट्टी ?

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाणार आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्मा या सामन्यात पुन्हा एकदा प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल करू शकतो. रोहित शर्माने या मॅचमध्ये कमी ओव्हर्समुळे एक बॉलर कमी खेळवून ऋषभ पंतला प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान दिले होते. हैदराबादमध्ये रोहित पुन्हा एकदा ५ गोलंदाजांसह मैदानात उतरेल.

नागपूर टी-२० मध्ये जसप्रीत बुमराह, हर्षल पटेल, अक्षर पटेल आणि यझुवेंद्र चहल या चार गोलंदाजांसह मैदानात उतरले होती. त्याचवेळी हार्दिक पांड्या संघात अष्टपैलू खेळाडूची भूमिका बजावत आहे. निर्णायक सामन्यात रोहित शर्माला धोका पत्करायचा नाही. हार्दिक पांड्यासह एकूण ६ गोलंदाजांसह मैदानात उतरण्याचा त्याचा प्रयत्न असणार आहे.

जर तो अतिरिक्त गोलंदाज खेळला तर ऋषभ पंत संघाबाहेर जाण्याची शक्यता आहे. भारतासमोर तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून भुवनेश्वर कुमार आणि दीपक चहरच्या रूपात दोन पर्याय आहेत. उमेश यादव देखील भारतीय संघाचा एक भाग असला तरी तो टी-२० विश्वचषक संघात नाही. त्यामुळे रोहित, भुवी किंवा चहरला संधी देण्याचा विचार करेल.

दीपक चहर राखीव खेळाडू म्हणून टी-२० विश्वचषक खेळणार आहे. भुवनेश्वर कुमारला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात संधी देण्यात आली होती. अशा परिस्थितीत दीपक चहरला विश्वचषकापूर्वी सरावाची संधी मिळावी, अशी रोहितची इच्छा आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या