37.6 C
Latur
Monday, April 19, 2021
Homeक्रीडापंत च्या शतकामुळे यजमानांना ८९ धावांची आघाडी

पंत च्या शतकामुळे यजमानांना ८९ धावांची आघाडी

एकमत ऑनलाईन

टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरच्या फंलदाजांनी पहिल्या डावात निराशा केली. शुबमन गिल आणि विराट कोहलीने सपशेल निराशा केली. तर चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेला योग्य सुरुवात मिळाली. होती पण त्यांना या खेळीचे मोठ्या आकड्यात रुपातंर करता आले नाही. यामुळे टीम इंडिया अडचणीत सापडली पण ऋषभ पंत(१०१) आणि सुंदर(६०) यांनी सातव्या विकेटसाठी ११३ धावांची भागीदारी करत यजमानांना आघाडी मिळवून दिली त्यामध्ये पंतच्या ७१ वॉशिंग्टन सुंदर च्या४० धावांचा समावेश होता ऋषभ पंत ने भारतातील पहिल तर एकुणातील तिसर शतक झळकवल त्याने ९४ वर असताना गुडघे टेकत स्क्वेअर लेगला षटकार खेचत शंभरी पूर्ण केली त्यानं ११८चेंडूत दोन षटकार व १३ चौकारांसह ही खेळी केली त्याचे फटके खेळपट्टीच्या चारी बाजूला होते त्याचा रिव्हर्स स्वीपवरचा चौकार तर अफलातून अन टी २० स्टाईलचा होता.

ऋषभ पंत ला पहिल्या ५० धावा करायला ८२चेंडू लागले तर त्यानंतरच्या पन्नास धावा त्याने फक्त ते ३३ चेंडूत केल्या सातव्या विकेटच्या भागीदारीमुळे खेळपट्टी मध्ये काही दम नसल्याचे दाखवून दिले रथी महारथी संयम न दाखवता फलंदाजी केली खेळपट्टीवर संयमी फलंदाजी केली तर धावा होतात हे तळातील फलंदायांनी दाखवून दिले शुबमन गिल गेल्या काही सामन्यांपासून सातत्याने अपयशी ठरतोय.त्याला मोठी खेळी साकारण्यात अपयश येत आहे. भारताने पहिल्या दिवसखेर २४ धावा करुन एक विकेट गमावली. या धावसंख्येपासून रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजाराने दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. सुरुवातीचे काही ओव्हर्स चांगल्या प्रकारे खेळल्या. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ४०धावांची भागीदारी केली. पण त्यानंतर जॅक लीचने इंग्लंडच्या वाटेतील मोठा काटा काढला. सेट झालेल्या पुजाराला लीचने सतरा धावांवर आऊट केलं. पुजाराने ६६ चेंडूत एका फोरसह १७ धावा काढल्या.पुजारानंतर विराट चौथ्या क्रमांकावर फंलदाजीसाठी आला. विराटकडून सर्वांनाच मोठ्या खेळीची अपेक्षा होती.

पण विराटला आपल्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. विराटने पहिले ७ चेंडू डॉट केले. त्यानंतर तो आठव्या चेंडूवर शून्यावर आऊट झाला. बेन स्टोक्सने विराटला आऊट केलं. स्टोक्सने विराटला आऊट करण्याची ही पाचवी वेळ ठरली. तसेच विराट कसोटीमध्ये कर्णधार म्हणून आठव्यांदा आऊट झाला. यासह त्याने धोनीच्या नकोशा विक्रमाची बरोबरी केली.मराठमोळ्या अजिंक्य रहाणेने झोकात सुरुवात केली. पण त्याला खेळीचे मोठ्या आकड्यात रुपांतर करता आले नाही. रहाणेने ४५ चेंडूत ४ चौकारांसह २७ धावा केल्या.एका बाजूला ठराविक अंतराने विकेट जात होते. पण सलामीवीर रोहित शर्माने एक बाजू लावून धरली. रोहितने एकाकी झुंज दिली. रोहितचे अर्धशतक अवघ्या एका धावेने हुकले. रोहित ४९ धावांवर बाद झाला. बेन स्टोक्सने रोहितला एलबीडबल्यू आऊट केलं. रोहितने १४४ चेंडूत सात चौकारांसह ४९ धावांची खेळी केली. रोहित न रचलेल्या पायावर पंत आणि सुंदर ने शिखर उभे केले

कसोटीच्या तिसऱ्या दिवशी वॉशग्टन सुंदर च्या शतकाची प्रतीक्षा यजमानांना असेल त्यानंतर कदाचित डाव घोषित करणे विषयी विचार होऊ शकेल पण पहिल्या डावातील आघाडी जेवढी जास्त वाढवता येईल तेवढे यजमानांना फायद्याचे होईल

पार्डीच्या शेतक-यांनी मिळविले टरबूजाचे विक्रमी उत्पादन; दिड एकरात दोन लाखांचे उत्पन्न

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,477FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या