27 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeक्रीडापटेलने मोडला धोनीचा रेकॉर्ड

पटेलने मोडला धोनीचा रेकॉर्ड

एकमत ऑनलाईन

लंडन : टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या गेलेल्या दुस-या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलने अप्रतिम कामगिरी केली. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात संपूर्ण थरार पाहायला मिळाला. वेस्ट इंडिजचा संघ पाहतच राहिला आणि भारताने हरलेला सामना जिंकला. अक्षर पटेल टीम इंडियाच्या विजयाचा हिरो ठरला, सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अक्षर पटेलने अवघ्या ३५ चेंडूत ६४ धावा केल्या. त्याने या मॅचमध्ये एमएस धोनीचा १७ वर्ष जुना विक्रमही मोडला, जे जाणून तुम्हीही थक्क व्हाल.

अक्षर पटेल या सामन्यात ७ व्या क्रमांकावर फलंदाजी करताना मॅच विनिंग इनिंग खेळला. या इंिनगमध्ये त्याच्या बॅटने पाच विस्फोटक षटकार मारताना दिसले. अक्षर पटेल यासह सातव्या क्रमांकावर किंवा त्याखालील क्रमांकावर फलंदाजी करताना यशस्वी धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज बनला आहे. एवढेच नाही तर भारताला सामना जिंकण्यासाठी शेवटच्या ३ चेंडूत ६ धावांची गरज होती. अक्षर पटेलने ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर षटकार ठोकत टीम इंडियाला विजय मिळवून दिला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या