27.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeक्रीडासामनावीर मोहम्मद रिझवानला मोठी दुखापत

सामनावीर मोहम्मद रिझवानला मोठी दुखापत

एकमत ऑनलाईन

दुबई : यंदाच्या आशिया चषकात खेळाडूंच्या दुखापतींनी अनेक संघांची डोकेदुखी वाढवली आहे. याचा सर्वात जास्त फटका भारत आणि पाकिस्तान यान दोन संघांना बसला आहे. स्पर्धेआधी जसप्रीत बुमरा आणि हर्षल पटेल भारतीय संघातून बाहेर पडले. ऐन स्पर्धेदरम्यानही खेळाडूंच्या दुखापतींनी डोकं वर काढलं. पाकिस्तानला शाहीन शाह आफ्रिदीच्या रुपात सर्वात मोठा धक्का बसला. आणि आता तीन सामन्यानंतर पाकिस्तान संघाच्या मॅचविनरला दुखापत झाली आहे. त्यामुळे ऐन सुपर फोर लढतींदरम्यान पाकिस्तानही टेन्शनमध्ये आला आहे.

पाकिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान सोमवारी भारताविरुद्धच्या सामन्यात हीरो ठरला. त्याच्या मॅचविंिनग इंिनगमुळे पाकिस्ताननं भारतावर ५ विकेट्सनी मात केली. पण याच सामन्यात फिंिल्डग करताना रिझवानच्या उजव्या पायाला दुखापत झाली. गोलंदाज मोहम्मद हसनैनचा चेंडू अडवताना रिझवानला ही दुखापत झाली. त्यामुळे आज त्याचा एमआरआय स्कॅन करण्यात येणार आहे. त्यानंतर तो उर्वरित सामन्यात खेळणार की नाही हे स्पष्ट होईल. पण यामुळे पाकिस्तानी कर्णधार बाबर आझमसमोरच्या अडचणी मात्र वाढल्या आहेत.

यंदाच्या आशिया चषकात आतापर्यंत तीन पाकिस्तानी खेळाडू दुखापतीमुळे स्पर्धेतून बाद झाले आहेत. स्पर्धेआधी शाहीन शाह आफ्रिदीच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. त्यानंतर मोहम्मद वसीम ज्युनियर स्पर्धेच्या दोन दिवस आधी नेट्समध्ये सराव करताना दुखापतग्रस्त झाला. पाकचा युवा गोलंदाज शाहनवाज दहानीही दोन सामन्यानंतर जायबंदी झाला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या