34.3 C
Latur
Tuesday, April 20, 2021
Homeक्रीडाखेळाडूंना कोरोना प्रतिबंधक लस देणार; बीसीसीआयचा मोठा निर्णय

खेळाडूंना कोरोना प्रतिबंधक लस देणार; बीसीसीआयचा मोठा निर्णय

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली: भारतात येत्या दिवसात आयपीएलचा थरार रंगणार आहे. मागील वर्षी आयपीएल सामने दुबईत प्रेक्षकांविना खेळले गेले. तर यावर्षी हे सामने भारतात होणार आहेत. भारतात होणारे सामने मागील वर्षाप्रमाणेच यावर्षी देखील प्रेक्षकांविना होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर आयपीएल तोंडावर येऊन ठेपली असताना बीसीसीआयने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.

देशात वाढत्या कोरोना रुग्णांमुळे बीसीसीआयने आयपीएलमध्ये सहभागी होणा-या खेळाडूंना कोरोना प्रतिबंधक लस देण्याचा निर्णय घेतला असून यासाठी बीसीसीआयने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे प्रस्तावदेखील पाठवला असल्याची माहिती बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी दिली. बीसीसीआय खेळाडूंच्या लसीकरण मोहिमेचा गंभीरपणे विचार करत आहे, असं राजीव शुक्ला म्हणाले.

बीसीसीआयची खबरदारी
कोरोनासंबंधी बीसीसीआय योग्य ती खबरदारी घेत आहे. यासाठी ६ बायो बबल केंद्रांची निर्मिती केली आहे. खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यास त्यासाठी खेळाडूंची संख्या वाढवण्यात आली आहे, असं देखील राजीव शुक्ला यांनी सांगितले़ वानखेडे स्टेडियमवरील १० देखरेख करणा-या कर्मचा-यांना कोरोना लागण झाली होती. तर ८ संयुक्त समिती कर्मचा-यांना देखील कोरोना झाला आहे. तर दिल्ली कॅपिटल्सचा अक्षर पटेल याला नुकताच कोरोना झाला आहे़

सलुन दुकाने बंद ठेवण्याच्या आदेशामुळे व्यवसायिकांवर उपासमारीची वेळ

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,478FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या