25.5 C
Latur
Saturday, September 18, 2021
Homeक्रीडाभारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेत बदलाची शक्यता

भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेत बदलाची शक्यता

एकमत ऑनलाईन

लंडन: भारतीय संघ पुढील महिन्यात इंग्लंड दौ-यावर जाणार आहे. टीम इंडिया प्रथम न्यूझीलंडविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप खेळणार आहे. त्यानंतर इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. कोरोनामुळे स्थगित करण्यात आलेल्या आयपीएलच्या १४ व्या हंगामातील उर्वरीत ३१ लढती इंग्लंडमध्ये घेण्याची बीसीसीआयची योजना आहे. यासाठी त्यांनी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाला एक विनंती केली आहे.

आयपीएलच्या १४ व्या हंगामातील ३१ लढतींसाठी कसा वेळ काढायचा याचे सर्वात आव्हान बीसीसीआयला आहे. भारताच्या इंग्लंड दौ-यानंतर मिळणा-या वेळेत आयपीएलच्या लढती इंग्लंडमध्ये खेळवण्याची बीसीसीआयची योजना आहे. त्यासाठी त्यांनी इसीबीला विनंती केली आहे. दोन्ही देशात होणारी पाच सामन्यांची कसोटी मालिका एक आठवडा आधी सुरू करावी. ज्यामुळे आयपीएलच्या ३१ सामन्यांसाठी वेळ मिळेल, असे इसीबीला कळवले आहे.

बीसीसीआयकडून यासंदर्भात अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेले नाही. पण इंग्लंडचे माजी कर्णधार मायकल अथरटन यांनी एका वृत्तपत्रात याबाबत सांगितले आहे. संबंधित दोन्ही बोर्डातील अधिका-यांमध्ये या संदर्भात अनौपचारिक चर्चाही झाल्याचे अथरटन यांनी म्हटले आहे.

औरंगाबादेत दोनशेहून अधिक बालके कोरोनाग्रस्त

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या