22.2 C
Latur
Friday, August 19, 2022
Homeक्रीडारजत पाटीदारचे दमदार शतक

रजत पाटीदारचे दमदार शतक

एकमत ऑनलाईन

बंगळुरू : रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात आज चौथ्या दिवशी मध्य प्रदेशने सामन्यावरील आपली पकड अजून मजबूत केली. मुंबईने पहिल्या डावात केलेल्या ३७४ धावांच्या प्रत्युत्तरात खेळताना मध्य प्रदेशने तिस-या दिवसअखेर ३ बाद ३६८ धावांपर्यंत मजल मारली होती. चौथ्या दिवशी मध्य प्रदेशच्या रजत पाटीदारने आपल्या अर्धशतकाचे रूपांतर शतकात केले. त्याच्या या शतकी खेळीमुळे मध्य प्रदेशने आपली पहिल्या डावातील आघाडी शतकाच्या पार नेली.

मध्य प्रदेशचा सलामीवीर यश दुबे (१३३), शुभम शर्मा (११६) यांनी तिस-याच दिवशी शतकी खेळी करत संघाला मजबूत स्थितीत नेले होते. तिस-या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी मध्य प्रदेशने ३ बाद ३६८ धावा केल्या होत्या. मुंबईवर आघाडी घेण्यासाठी फक्त ६ धावांची गरज होती.

तिस-या दिवसअखेर रजत पाटीदार अर्धशतक करून नाबाद होता. या अर्धशतकाचे रूपांतर रजतने शतकात केले. त्याच्या या शतकाच्या जोरावर मध्य प्रदेशने उपाहारापर्यंत ६ बाद ४७५ धावांपर्यंत मजल मारली. सध्या रजत पाटीदार १२० तर सारांश जैन २० धावा करून नाबाद आहेत.

दुसरीकडे ४१ रणजी ट्रॉफी विजेतेपदे पटकावणा-या मुंबईसाठी मध्य प्रदेशची वाढती आघाडी डोकेदुखी ठरत आहे. सामन्यावर पुन्हा पकड मिळवण्यासाठी चौथ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात मुंबईला मध्य प्रदेशचा पहिला डाव गुंडाळणे गरजेचे होते. मात्र मुंबईला चौथ्या दिवशी उपाहारापर्यंत फक्त ३ विकेट घेता आल्या आहेत. मुंबईकडून तुषार देशपांडे, मोहित अवस्थी आणि शम्स मुलानी यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या