22.7 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeक्रीडाभारताविरुद्ध सामन्यासाठी कसून सराव करतोय मोहम्मद रिझवान

भारताविरुद्ध सामन्यासाठी कसून सराव करतोय मोहम्मद रिझवान

एकमत ऑनलाईन

 नेट्समध्ये केली धडाकेबाज प्रॅक्टिस

नवी दिल्ली : भारत विरुद्ध पाकिस्तान हा हायव्होल्टेज सामना २८ ऑगस्टला रंगणार असून दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाचा असा हा सामना आहे. त्यामुळे अशा महत्त्वपूर्ण सामन्यापूर्वी दोन्ही संघातील खेळाडूंवर दबावही तितकाच असतो. त्यात पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिझवान कसून सराव करताना दिसत आहे. त्याचा नेटमधील सरावाचा व्हीडीओ पाकिस्तान क्रिकेटने शेअर केला असून यात रिझवान दमदार सराव करत आहे.

मोहम्मद रिझवान याने भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात पार पडलेल्या मागील टी-२० विश्वचषकात अप्रतिम खेळी केली होती. त्याने ५५ चेंडूंत ७९ धावा केल्या होत्या. त्याला कर्णधार बाबरने ५२ चेंडूंत ६८ धावांची मदत करत पाकिस्तानला १० विकेट्सनी विजय मिळवून दिला होता. त्यामुळे यंदाही रिझवानवर पाकिस्तान संघाची मोठी जबाबदारी असून भारतीय गोलंदाजांना सावधानता बाळगणे गरजेचे आहे.

कधी, कुठे रंगणार यंदाचा भारत-पाकिस्तान सामना?
आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान २८ ऑगस्टला आमने-सामने येणार आहेत. हा सामना दुबईत खेळला जाणार आहे. या स्पर्धेतील ग्रुप सामन्यानंतर सुपर फोर सामने खेळले जाणार आहेत. त्यानंतर अंतिम सामना खेळला जाणार आहे. या स्पर्धेतील अंतिम सामनाही दुबईत ११ सप्टेंबर रोजी खेळला जाणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या