मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर खेळाडू पृथ्वी शॉ याच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी मुंबईतील ओशिवरा पोलिसांनी आणखी दोन फरार आरोपींना अटक केली आहे. पृथ्वी शॉ आणि त्याच्या मित्रांवर हल्ला झाला होता.
या हल्ल्यानंतर पोलिसांनी सोशल मीडिया इल्फ्यून्सर सपना गिलला अटक केली होती. आता आणखी दोन फरार आरोपी पोलिसांच्या अटकेत आहेत. ओशिवरा पोलिसांनी दोन संशयित आरोपींना शुक्रवारी चौकशीसाठी बोलावले होते. त्यानंतर आता या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, पृथ्वी शॉच्या मित्रांकडून ओशिवरा पोलिसांत हल्ल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली होती. यानंतर ओशिवरा पोलिसांनी कारवाई करत सपना गिलनंतर दोन फरार आरोपींना अटक केली आहे. पृथ्वी शॉसोबत सेल्फी घेण्यावरून हा वाद झाला होता. हा वाद नंतर हाणामारीवर पोहोचला. सपना गिल आणि तिच्या साथीदारांनी पृथ्वी शॉ आणि मित्रांवर हल्ला केल्याचा आरोप पोलिसांत दिलेल्या तक्रारीत करण्यात आला आहे.