22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeक्रीडापंतप्रधानांकडून प्रोत्साहन मिळणे हे अभिमानास्पद : हरमनप्रीत कौर

पंतप्रधानांकडून प्रोत्साहन मिळणे हे अभिमानास्पद : हरमनप्रीत कौर

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : बर्मिंगहॅम येथे पार पडलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंनी शनिवारी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मोदींनी या खेळाडूंचा गौरव केला. पंतप्रधानांच्या निवासस्थानी झालेल्या या सोहळ्यास कुस्ती, वेटलिफ्टिंगह बॉक्ंिसग, क्रिकेट, बॅडमिंटन आणि टेबल टेनिसपटू उपस्थित होते. दरम्यान, नरेंद्र मोदींची भेट घेतल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने मोठं वक्तव्य केलं. देशाच्या पंतप्रधानांकडून प्रेरणा मिळणे महत्त्वाचे आहे, असे ती म्हणाली.

ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आमच्याशी संवाद साधत होते त्यावेळी संपूर्ण देश भारतीय महिला क्रिकेट संघाला पाठिंबा दर्शवत असल्याचे जाणवत होते. देशाच्या पंतप्रधानांकडून प्रोत्साहन मिळणे ही खूप मोठी गोष्ट आहे.

भारतीय खेळाडूंची कामगिरी भावी पिढीसाठी प्रेरणादायी- मोदी
भारतीय खेळाडूंनी बर्मिंगहॅम येथे झालेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत २२ सुवर्ण, १६ रौप्य आणि २३ कांस्यपदकांसह एकूण ६१ पदकं जिंकली आहेत. भारतीय खेळाडूंनी या स्पर्धेत केलेली कामगिरी भावी पिढीसाठी निश्तिच प्रेरणादायी असल्याचेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या