पुणे : पुणे जिल्ह्यातील पैलवान तनिष्क प्रविण कदमने बाहरिन येथे झालेल्या १५ वर्षाखालील आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. तनिष्कने आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेल्या दमदार कामगिरीचे कौतुक भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले.
वस्त्राकर देखील चमकल्या
चंद्रकांत पाटील यांनी तनिष्कचा फोटो शेअर करत ट्विट केले की, पुणे जिल्ह्याचे सुपुत्र पैलवान तनिष्क प्रविण कदम यांनी बहरिन येथे झालेल्या १५ वर्षाखालील आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. तनिष्क यांचा सर्व पुणेकरांनाच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान आहे.
मन:पूर्वक अभिनंदन !
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेवरून महाराष्ट्रातील राजकारण तापले होते. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बर्खास्त करण्याचा निर्णय भारतीय कुस्ती संघटनने घेतला होता. याचा संबंध महाराष्ट्रात नुकत्याच घडलेल्या राजकीय घडामोडींशी जोडला जात होता.