23.6 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeक्रीडापंजाब ने शेवट गोड केला

पंजाब ने शेवट गोड केला

एकमत ऑनलाईन

आयपीएल २०२२ मधील शेवटचा साखळी सामना हैदराबाद विरुद्ध पंजाब रविवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर पार पडला. हा सामना पंजाबने ५ गडी व३५ चेंडू राखून जिंकला. या विजयाचा हिरो लियाम लिविंगस्टोनने चांगली फटकेबाजी केली. हरप्रीत ब्रारला गोलंदाजीतील कामगिरीसाठी सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. पंजाबने हा विजय मिळवत शेवट गोड केला असला, तरी हे दोन्ही संघ हंगामातून आधीच बाहेर पडले आहेत हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना हैदराबाद संघाने मर्यादित २० षटकांत ८बाद १५७ धावा केल्या.

फलंदाजी करताना हैदराबादच्या हैदराबादच्या अभिषेक शर्माने ३२ चेंडूत, ५चौकार आणि दोन षटकारांसह सर्वाधिक ४३ धावा चोपल्या. रोमिरीओ शेफर्ड (नाबाद २६), वॉशिंग्टन सुंदर (२५) धावा, एडेन मार्करम (२१ )धावा आणि राहुल त्रिपाठी (२०) धावा केल्या. तसेच, प्रियम गर्ग ४, कर्णधार भुवनेश्वर कुमार १ आणि जगदीश सुचित शून्य धावेवर बाद झाला.यावेळी पंजाबकडून गोलंदाजी करताना हरप्रीत ब्रार आणि नेथन एलिस यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या.

तसेच, कागिसो रबाडाने १ विकेट आपल्या नावावर केली. प्रत्युत्तरात पंजाब किंग्जने हे लक्ष्य ६गडी गमावत अवघ्या १५.१ षटकात सहजरीत्या गाठले.या सामन्यात हैदराबादचा प्रभारी कर्णधार भुवनेश्वरकुमारने नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजी करताना लियाम लिविंगस्टनने २२ चेंडूत दोन चौकार आणि ५षटकारासह नाबाद ४९ धावाचा पाऊस पाडला. शिखर धवन(३९), जॉनी बेअरस्टो (२३), शाहरुख खान आणि जितेश शर्मा यांनी प्रत्येकी १९ धावांचे योगदान दिले.यावेळी हैदराबादकडून गोलंदाजी करताना फजलहक फारूकीने चार षटकांत ३२धावात दोन विकेट घेतल्या त्याशिवाय वॉशिंग्टन सुंदर, जगदीश सुचिथ आणि उमरान मलिक यांनी प्रत्येकी १ विकेट खिशात घातली मागील सलग चार हंगामांमध्ये पंजाबचा संघ सहाव्या स्थानावर राहिला आहे.

आयपीएल २०१९, आयपीएल २०२०, आयपीएल २०२१ आणि आता आयपीएल २०२२मध्ये देखील पंजाब किंग्ज गुणतालिकेत ६ व्या क्रमांकावर राहिला. शनिवारच्या सामन्यात मुंबईने विजय मिळवून दिल्लीला स्पर्धेतून बाहेर केले याबरोबरच मुंबईने दिल्लीबरोबरचा चार वर्षांपूर्वीच्या सामन्याचा बदला चूकता केला. मुंबई सध्या गुणतालिकेत अखेरच्या क्रमांकावर आहे आणि त्यांनी आता दिल्लीला पराभूत करत प्लेऑफमध्ये जाण्यापासून रोखले चार वर्षांपूर्वीदेखील अशीच घटनाघडली होती.

पण त्यावेळी दिल्ली कॅपिटल्सने मुंबईला स्पर्धेतून बाहेर केले होते २०१८ मध्ये दिल्लीचा संघ अखेरच्या स्थानावर होता त्यावेळी मुंबईला प्लेऑफमध्ये जाण्यासाठी एका विजयाची गरज होती. त्यावेळी दिल्ली ने मुंबईला आपल्या घरच्या मैदानात ११ धावांनी पराभूत केले. त्यामुळे मुंबईला प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर जावे लागले होते. आता चार वर्षांनंतर अशाचप्रकारे मुंबईने दिल्लीला बाहेर केले.
– डॉ. राजेंद्र भस्मे
कोल्हापूर, मो. ९४२२४ १९४२८

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या