27.8 C
Latur
Thursday, October 21, 2021
Homeक्रीडापंजाब प्ले ऑफ च्या उंबरठ्यावर; पंजाबचा सलग पाचवा विजय

पंजाब प्ले ऑफ च्या उंबरठ्यावर; पंजाबचा सलग पाचवा विजय

एकमत ऑनलाईन

किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने आज कोलकता नाईट रायडर्सचा शारजा वर आठ गडी व सात चेंडू राखून पराभव केला. या विजयाने किंग्ज इलेव्हन पंजाबने गुणतक्त्यात चौथे स्थान पटकावत बाद फेरीच्या दिशेने भक्कम पाऊल टाकले. काही दिवसापूर्वी तळातील स्थानावर असणाऱ्या पंजाबने आज चौथ्या स्थानावर उडी मारली त्यांची धावगती कोलकता पेक्षा वरचढ असल्यान प्ले ऑफ ची संधी आहे मात्र उरलेल्या दोन्ही सामन्यात विजय मिळवावाच लागेल कोलकत्ताचा पराभव झाल्यानेे ते बारा गुणावरच राहिले आणि पराभवामुळे त्यांची धावगती कमी झाली उभय.कोलकत्ता व पंजाब या दोघांना ही राजस्थान व चेन्नई यांच्याशी खेळावयाचे आहे पंजाब ब कोलकात्याचे प्रतिस्पर्धी एकच आहेत प्ले ऑफ मधे जाण्यासाठी दोघांनाही दोन्ही विजयाची नितांत गरज आहे दोन्ही संघानी दोन दोन विजय मिळवल्यास कहानीमे ट्विस्ट आएगा

लोकेश राहुल ने नाणेफेक जिंकून कलकत्त्याला फलंदाजीसाठी पाचारण केले प्रथम फलंदाजी करताना कोलकताला २० षटकांत ९ बाद १४९ धावांचीच मजल मारता आली लोकेशने सलामीसाठी ग्लेन मॅक्सवेल्ल ला गोलंदाजी दिली नितीश राणा दुसऱ्याच चेंडूवर गेलच्या हाती झेल देऊन तंबूत परतला मोहम्मद शमीने दुसऱ्याच षटकात राहुल त्रिपाठी आणि दिनेश कार्तिकला तंबूचा रस्ता दाखवला त्यानंतर शुभमन गिल (५७) आणि कर्णधार इयॉन मॉर्गन (४०) यांच्या ८१ धावांच्या भागीदारी खेरीज कोलकत्याच्या डावात फारसे वेगळे काही घडले नाही. नाही म्हणायला शेवटी लॉकी फर्ग्युसन याने १३ चेंडूंत २४ धावांची खेळी करताना कोलकात्याच्या आव्हानाला बळकटी आणण्याचा प्रयत्न केला.महंमद शमीच्या(३५धावात३) अचूक गोलंदाजीपुढे कोलकत्याचे फलंदाज टिकू शकले नाहीत. शुभमन, मॉर्गन आणि फर्ग्युसन वगळता त्यांच्या एकाही फलंदाजाला दुहेरीआकड्यात मजल मारता आली नाही. शमीला ख्रिस जॉर्डन आणि रवी बिष्णोई यांची साथ मिळाल्यामुळे पंजाबच्या गोलंदाजीला वेगळीच धार आली होती.

आजच्या सामन्यातही वेगळे काही घडले नाही. राहुल-मनदीपची सलामी बहरत असतानाच तुटली. त्यानंतर मनदीपच्या आत्मविश्वासाला गेलच्या आक्रमकतेने प्रेरित केले आणि मनदीपने आपल्या गुणवत्तेची झलक दाखवत शानदार खेळी केली. गेलने नेहमीप्रमाणे आपली बॉसगिरी दाखवून देत २९ चेंडूंतच ५१ धावांची खेळी करताना पाच षटकारांची आतषबाजी केली. मनदीपनेही नाबाद ६६ धावांची खेळी करताना ८ चौकार, २ षटकार लगावले. या जोडीने १०० धावांची भागीदारी केली. मात्र, विजयासाठी दोन धावांची गरज असताना गेल बाद झाला. पण, मनदीपने पूरनच्या साथीत ती औपचारिकता पूर्ण केली.

वडिलांच्या निधनाचे वृत्त पचवून संघ हिताला प्राधान्य देत संघाबरोबर राहणाऱ्या मनदीप सिंगच्या सुरेख खेळीच्या जोरावर पंजाब ने सलग पाचवा विजय मिळवला त्यानंतर मनदीपच्या आक्रमकतेला ख्रिस गेलच्या धमाक्याची साथ मिळाली आणि पंजाबचा आणखी एक विजय साकार झाला. त्यांनी १८.५ षटकांत २ बाद १५० धावा केल्या. मनदीपची नाबाद ६६ धावांंची खेळी निर्णायक ठरली.देर आए दुरुस्त आए, अशा पद्धतीशी जुळणारा पंजाबचा प्रवास म्हणावा लागेल. सुरवातीच्या चांगल्या कामिगरीनंतरही मधल्या टप्प्यात त्यांना बॅकफुटवर रहावे लागले होते. मात्र, पहिल्या सात सामन्यांच्या टप्पा संपल्यावर त्यांच्या आव्हानात गेलने वेगळीच जान आणली. त्याच्या समावेशानंतर त्यांच्या फलंदाजीला एक खोली आली. त्यापेक्षा आघाडीच्या फळीत वेगळा आत्मविश्वास आला. आपण लवकर बाद झालो, तरी पुढे गेल आहे या विचारानेच ते प्रेरित होत गेले. मग कधी राहुल-मयांक ही जोडी खेळली, तर कधी राहुल-मनदीप यांनी धमाकेदार सुरवात केली. यात साम्य इतकेच की या प्रत्येक सलामीनंतर त्यांना गेलच्या धमाक्याची साथ मिळाली.

डॉ.राजेंद्र भस्मे

शेतकऱ्यांना त्रास झाल्यास खपवुन घेणार नाही – खासदार हेमंत पाटील

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या