30.9 C
Latur
Monday, May 10, 2021
Homeक्रीडाअखेरच्या चेंडूवर पंजाब विजयी

अखेरच्या चेंडूवर पंजाब विजयी

एकमत ऑनलाईन

मुंबई : पंजाबकिंग्सने या हंगामातील सर्वाधिक धावसंख्या आज रचली आणि राजस्थानपुढे २२२ धावांचे आव्हान ठेवले होते. लोकेश राहुल आणि दीपक हुडा यांच्या अर्धशतकांच्या जोरावर पंजाबला हा धावांचा डोंगर उभारता आला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सचा युवा कर्णधार संजू सॅमननने धडाकेबाज फलंदाजी करत अर्धशतक साकारले. पण या सामन्यात पंजाबने चार धावांनी विजय साकारला. अखेरच्या चेंडूवर राजस्थानला विजयासाठी पाच धावांची गरज होती. त्यावेळी संजूने मोठा फटका मारला, पण तो झेलबाद झाला आणि राजस्थानला संजूच्या शतकानंतरही सामना गमवावा लागला. संजूने यावेळी ६३ चेंडूंत ११९ धावांची दमदार खेळी साकारली.

राजस्थानचे फलंदाज एकामागून एक बाद होत असले तरी सॅमसनने यावेळी धडाकेबाज फटकेबाजी करत या आयपीएलमधील पहिले शतक फटकावण्याचा मान पटकावला. तत्पूर्वी कर्णधार लोकेश राहुल, ख्रिस गेल, दीपक हुडा यांनी राजस्थानच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. त्यामुळेच पंजाबच्या संघाला राजस्थानपुढे २२२ धावांचे तगडे आव्हान ठेवता आले. आतापर्यंतच्या आयपीएलमधील ही सर्वाधिक धावसंख्या ठरली आहे. कारण आतापर्यंत एकाही संघाला या आयपीएलमध्ये २०० धावांचा टप्पा गाठता आला नव्हता.

राजस्थानने नाणेफेक जिंकली आणि पंजाबला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. यावेळी पंजाबची सुरुवात चांगली झाली नाही. कारण सलामीवीर मयांक अगरवालला यावेळी राजस्थानचा युवा वेगवान गोलंदाज चेतन साकरियाने बाद केले आणि पंजाबला पहिला धक्का दिला. मयांकला यावेळी १४ धावांवर समाधान मानावे लागले. मयांक बाद झाल्यावर ख्रिस गेल फलंदाजीला आला आणि त्यानंतर त्याने कर्णधार लोकेश राहुलच्या साथीने राजस्थानच्या गोलंदाजीवर जोरदार प्रहार केला. या दोघांनी दुस-या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचली. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात ख्रिस गेलने आयपीएलमधील ३५०वा षटकार खेचला. गेलला यावेळी मोठी खेळी साकारता आली नाही. कारण रायन परागने बेन स्टोक्सकरवी गेलला बाद केले, गेलने यावेळी २८ चेंडूंत ४ चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ४० धावा केल्या. या सामन्यात गेलला एकदा आणि राहुलला दोनदा जीवदान मिळाले.

धडाकेबाज फलंदाजी करत असलेला ख्रिस गेल बाद झाल्यावर राहुल आणि दीपक हुडा यांनी संघाची धावगती चांगलीच वाढवली. राहुलने यावेळी आपले अर्धशतकही पूर्ण केले. पण राहुलपेक्षा यावेळी हुडा जास्त आक्रमक फलंदाजी करत असल्याचे पाहायला मिळाले. हुडाने यावेळी २० चेंडूंमध्येच आपले अर्धशतक साजरे केले. अर्धशतक पूर्ण करताना हुडाने यावेळी सहा षटकार आणि एक चौकार लगावला. हुडाने यावेळी २८ चेंडूंत चार चौकार आणि सहा षटकारांच्या जोरावर ६४ धावांची तुफानी खेळी साकारली. त्यामुळे विक्रमी धावसंख्या उभारता आली.

बावधनच्या बगाड यात्रेनंतर ६१ जण पॉझिटिव्ह

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,494FansLike
184FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या