Tuesday, October 3, 2023

भारताच्या आॕलिम्पिक मोहिमेला धक्का ; ‘वाडा’कडून निलंबनात वाढ

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय दर्जाचे चाचणी साहित्य नसल्याचे कारण देत जागतिक उत्तेजकविरोधी संस्थेकडून (वाडा) राष्ट्रीय उत्तेजक चाचणी प्रयोगशाळेवरील (एनडीटीएल) निलंबनात सहा महिन्यांची वाढ करण्यात आली आहे. ‘वाडा’च्या या निर्णयामुळे टोक्यो आॕलिम्पिक क्रीडा स्पर्धा एका वर्षावर असताना भारताच्या आॅलिम्पिक मोहिमेला धक्का बसला आहे.

‘वाडा’कडून गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये ‘एनडीटीएल’वर सहा महिन्यांचे निलंबन घालण्यात आले होते. पुन्हा एकदा फेब्रुवारीमध्ये ‘वाडा’कडून करण्यात आलेल्या तपासात आंतरराष्ट्रीय दर्जाप्रमाणे आवश्यक चाचण्यांचे साहित्य उपलब्ध नसल्याचे कारण देण्यात आले आहे.

‘‘नवी दिल्ली येथील राष्ट्रीय उत्तेजक चाचणी प्रयोगशाळेची मान्यता दुस-या वेळेस सहा महिन्यांसाठी रद्द करत आहोत. या निलंबनामुळे उत्तेजकविरोधी प्रकरणातील चाचण्या करता येणार नाहीत,’’ असे ‘वाडा’ने स्पष्ट केले आहे. जानेवारी २०२१ पर्यंत हे निलंबन असणार आहे.

Read More  जेनेलियासमवेत रितेश बनविणार “शाकाहारी मीट’

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या