26.1 C
Latur
Sunday, September 19, 2021
Homeक्रीडापीव्ही सिंधूचा सेमीफायनलमध्ये पराभव

पीव्ही सिंधूचा सेमीफायनलमध्ये पराभव

एकमत ऑनलाईन

टोकियो : रियो ओलिम्पिक २०१६ मध्ये अंतिम सामन्यापर्यंत मजल मारुन भारताला रौप्य पदक मिळवून देणा-या भारताच्या स्टार महिला बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूला टोकियो ऑलिम्पिकमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. शनिवारी झालेल्या सामन्यात सिंधूला महिला एकेरी वर्गात दुस-या सेमीफायनलच्या सामन्यात प्रतिस्पर्धी चीनी ताइपेच्या ताई त्जू यिंग हिने मात दिली. सामन्यात २१-१८ आणि २१-१२ अशा सरळ सेट्समध्ये सिंधूला पराभव पत्करावा लागला.

सिंधूने सामन्यात सुरुवातीपासून कडवी झुंज दिली पहिल्या सेटमध्ये पुढे असणारी सिंधू हळूहळू मागे पडली आणि नंतर ताईने तिला परत पुढे येऊच न दिल्याने सिंधू पराभूत झाली. दोघांमधील सामना अत्यंत रोमहर्षक झाला. पण ताई हिने आपल्या कमी उंचीचा फायदा घेत सिंधूला कोर्टवर थकवून एक वेगळी रणनीतीने सामना जिंकला.

पहिला सेट
सामन्यात ताई त्जू हिने वर्चस्व ठेवले होते. मात्र पहिल्या सेटमध्ये सुरुवातीला सिंधू ५-२ च्या फरकाने ताईवर आघाडी घेतली होती. पण त्यानंतर ताईने आक्रमक खेळ करत काही गुण मिळवले. सिंधूकडूनही काही चूका झाल्याने ताईला आणखी गुण मिळाले. पण सिंधूने जबरदस्त झुंज देत पहिल्या ब्रेकपर्यंत ११-८ अशी आघाडी घेतली. ब्रेकनंतर ताई हिने ११-११ ची बरोबरी साधली. नंतर संपूर्ण सेट संपेपर्यंत दोघीही पुढे मागे अशाच स्कोरवर होत्या मात्र अखेर ताईने आघाडी घेत सेट २१-१८ ने जिंकला.

दुस-या सेटमध्येही सिंधू पराभूत
दुस-या सेटमध्ये ताई त्जूने पहिला गुण मिळवला. दुस-या सेटमध्ये ताईने सुरुवातीपासूनच सामन्यावर पकड जमवून ठेवली होती. सिंधूनेही अटीतटीचा खेळ दाखवला पण काही चूकांमुळे सतत ताई हिलाच गुण मिळत होते. ज्यामुळे सुरुवातीपासूनच ती सामन्यात आघाडीवर होती. त्यानंतर मात्र ताइ त्जूने सिंधूला सामन्यात पुनरागमन करु दिले नाही आणि अखेर सामना सिंधूच्या हातातून १२-२१ च्या फरकाने निसटला.

डेल्टाचा कांजण्यांप्रमाणे होत आहे संसर्ग

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या