18.1 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeक्रीडा‘चॅम्पियन’ टीमवर पडणार पैशांचा पाऊस ; उपविजेत्या टीमही होणार मालमाल

‘चॅम्पियन’ टीमवर पडणार पैशांचा पाऊस ; उपविजेत्या टीमही होणार मालमाल

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : टी-२० विश्वचषक २०२२ मध्ये ६ दिवसांनंतर क्रिकेट जगताला नवा चॅम्पियन मिळणार आहे. टी-२० विश्वचषक २०२२ चा अंतिम सामना रविवारी १३ नोव्हेंबर रोजी मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळवला जाईल. भारत, इंग्लंड, न्यूझीलंड आणि पाकिस्तानचे संघ २०२२ च्या टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचले आहेत.

भारत, इंग्लंड, न्यूझीलंड आणि पाकिस्तानमधील कोणताही एक संघ रविवारी १३ नोव्हेंबर रोजी मेलबर्न क्रिकेट मैदानावर टी-२० विश्वचषक २०२२ ची ट्रॉफी उचलेल. टी-२० विश्वचषक २०२२ ची ट्रॉफी जिंकण्याबरोबरच यावेळी विजेत्या संघावर पैशांचा पाऊसही पडणार आहे. एवढेच नाही तर पराभूत संघाला म्हणजेच अंतिम फेरीत उपविजेत्या संघालाही मोठी रक्कम मिळेल.

टी-२० विश्वचषक २०२२ चे विजेतेपद जिंकणा-या चॅम्पियन संघाला १.६ दशलक्ष यूएस डॉलर्स म्हणजेच तब्बल १३ कोटी रुपये मिळणार आहेत. तर उपविजेत्या संघाला याच्या निम्मी रक्कम मिळणार आहे. उपांत्य फेरीत पराभूत होणा-या दोन्ही संघांना ४-४ लाख अमेरिकन डॉलर्सची बक्षीस रक्कम मिळेल.
टी-२० वर्ल्डकप कोणाला किती रक्कम मिळणार –

विजेता- १३ कोटी

उपविजेता- ६.४२ कोटी

सेमीफायनल- ३.२६ कोटी

सुपर-१२ मधील विजय- ३२ लाख

सुपर-१२ मधून बाहेर होणारे- ५७ लाख

पहिल्या फेरीतील विजय- ३२ लाख

पहिल्या फेरीतून बाहेर होणारे- ३२ लाख

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या