21.8 C
Latur
Wednesday, October 21, 2020
Home क्रीडा विक्रमी विजय मिळवणारा राजस्थान पराभूत

विक्रमी विजय मिळवणारा राजस्थान पराभूत

एकमत ऑनलाईन

राजस्थानचा कर्णधार स्टिव्ह स्मिथने पुन्हा एकदा नाणेफेक जिंकली आणि आधीच्या सामन्याप्रमाणे या वेळेसही प्रतिस्पर्धी संघास फलंदाजीसाठी आमंत्रण देताना आव्हानाचा पाठलाग करणे पसंत केले. यातही जोफ्रा आर्चरची भेदकता नक्कीच धडकी भरवणारी होती. त्यामुळेच कोलकाताची धडपडत झालेली सुरुवात लक्षात घेता त्यांनी मारलेली मजल त्यांना नक्कीच समाधान देणारी ठरली. प्रथम फलंदाजी करताना कोलकाता नाईट रायडर्स संघाने २० षटकांत ६ बाद १७४ धावा केल्या. शुभमन गिल (४७), इयॉन मॉर्गन (३४) यांची फलंदाजी निर्णायक ठरली.

शुभमन गिलच्या साथीत सुनीलने (१५) आक्रमक फटके मारून चांगली सुरुवात केली. मात्र, त्याला लय कायम राखता आली नाही. शुभमन गिल आणि नितीश राणा (२२) ही जोडी देखील जमली. राणापाठोपाठ स्थिरावलेला गिल देखील बाद झाला. षटकामागे आठची धावगती राखूनही त्यांनी १२ षटकांत तीन प्रमुख फलंदाज गमावले होते. आंद्रे रसेलने तोवर खेळपट्टीवर उतरत झटपट २४ धावा ठोकल्या. पण, त्याला नेहमीप्रमाणे फटकेबाजीचा मोह आवरता आला नाही. कर्णधार दिनेश कार्तिकही अपयशी ठरला. इयॉन मॉर्गन टिकून राहिल्याचा कोलकाता संघाला फायदा झाला. त्यानेही आपली जबाबदारी चोख पार पाडली. त्याने २३ चेंडूत झटपट ३४ धावा केल्या.

अखेरच्या पाच षटकांत ५४ धावा वसूल करणा-या कोलकाताने यातील ४७ धावा अखेरच्या चार षटकांत फटकावल्या होत्या. स्थिरावल्यानंतर एकेक फलंदाज गमावल्यानंतरही पावणे दोनशेची मारलेली मजल कोलकाताला आनंद देणारी ठरली. कालचा दिवस राजस्थानचा नव्हताच. त्यांच्या डावाची वाताहत बघता पहिला डाव संपल्यावर ड्रेसिंगरूममध्ये परतताना राजस्थानचा गोलंदाज जोफ्रा आर्चरने व्यक्त केलेली भीती खरी ठरली. ‘खेळपट्टीचे स्वरूप लक्षात घेता १६० धावाही येथे आव्हानात्मक ठरू शकतात, त्यांनी १५ धावा अधिक काढल्या आहेत,’ असे आर्चर म्हणाला. आधीच्या सामन्यात दोनशेहून अधिक धावांचा पाठलाग करताना राजस्थानने शारजात षटकारांचे वादळ आणले होते. पण, इकडे दुबईत आल्यावर हे वादळ कोलकाता संघाच्या आणि पर्यायाने भारताचे भविष्य असणा-या गोलंदाजांसमोर शमले. शिवम मावी, कमलेश नागरकोटी यांची गोलंदाजी आणि त्यांनी घेतलेले झेल हे त्यांची गुणवत्ता सिद्ध करणारे होते.

निम्मा संघ सात षटकांतच ४२ धावांत गारद झाला. कर्णधार स्मिथ (३), सॅमसन (८), उत्थप्पा (२) असे प्रमुख फलंदाज झटपट गारद झाले. बटलर(२१) खेळपट्टीवर असल्याने राजस्थानला हायसे वाटत होते. पण, त्याची ही खेळी वरुण चक्रवर्तीने भन्नाट झेल घेत संपुष्टात आणली. शिवम मावीने सॅमसनची प्राईज विकेट मिळविली. आठव्या षटकात गोलंदाजी मिळाल्यावर नागरकोटीने षटकाच्या पहिल्या आणि चौथ्या चेंडूवर अनुक्रमे उत्थप्पा आणि रायन पराग (१) यांना बाद केले. पंजाबविरुद्ध तुफानी फटकेबाजी करणारा राहुल टिवाटिया(१४) देखील बाद झाला. राजस्थानच्या सगळ्या आशा आता संपल्या होत्या. आर्चरने आल्या आल्या षटकार ठोकत आपले मनसुबे स्पष्ट केले.

हाथरस येथे लोकशाही मार्गाने कर्तव्य बजावत असताना केलेल्या दडपशाहीविरोधात देशभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संताप – अमित विलासराव देशमुख

पण, पुढच्याच चेंडूवर वरुणला टोलवताना लाँगऑनवर नागरकोटीने त्याचा सुरेख झेल टिपला. पंधराव्या षटकात ८ बाद ८८ अशा स्थितीनंतर सामना वाचवणे कुणालाच शक्य नव्हते. टॉम करनने षटकार ठोकून आपले अर्धशतक पूर्ण केले. इतकेच की राजस्थानचा पूर्ण डाव संपला नाही. टॉम करनने नाबाद अर्धशतकी खेळी केली. कोलकाताच्या गोलंदाजांनी त्यांच्या क्षेत्ररक्षकांकडून अफलातून साथ मिळाल्यावर यंदाच्या मोसमात प्रथमच मालक शाहरूख खानला विजयाची भेट दिली.

डॉ. राजेंद्र भस्मे
कोल्हापूर, मो. ९४२२४ १९४२८

ताज्या बातम्या

दोन आणि तीन पदरी मास्क ३ ते ४ रुपयांना मिळणार : राजेश टोपे

मुंबई : कोरोना साथ आटोक्यात आणण्यासाठी महत्वाचा घटक असलेल्या मास्कची किंमत निश्चित करून योग्य त्या किमतीत नागरिकांना मास्क मिळावे यासाठी पुढाकार घेणारे राज्य म्हणून...

मराठी भाषेचा ऍमेझॉन ऍपमध्ये समावेश

मुंबई : ऑनलाइन शॉपिंगसाठी प्रसिद्ध असलेले ऍमेझॉन ऍप आता मनसेच्या इशा-यापुढे नमले आहे. कारण ऍमेझॉन ऍपमध्ये मराठी भाषेचा समावेश केला जाणार आहे. ऍमेझॉन ही...

शेतक-यांच्या दु:खाचे होऊ नये हसू!

हे वर्ष जगाच्या इतिहासात मानवाचे सत्व पाहणारे वर्ष म्हणूनच नोंदविले जाईल, यावर आता राज्यापुरते तरी शिक्कामोर्तबच झाले आहे. अगोदर कोरोनाने सगळा देश ठप्प करून...

नियोजनाचा ‘अंधार’

देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये काही तासांसाठी वीजपुरवठा खंडित झाला आणि पाहता पाहता देशभरात त्याची चर्चा सुरू झाली. या ‘बत्ती गुल’चा फटका लोकल सेवा, मुंबई...

क्वाड आणि आत्मनिर्भर भारत

टोकिओमध्ये काही दिवसांपूर्वी अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया आणि भारत या चतुष्कोनी समूहाची (क्वाड) बैठक झाली. परराष्ट्रमंत्री स्तरावरील ही दुसरी बैठक होती. या बैठकीत भारताचे परराष्ट्रमंत्री...

वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी साधला थेट शेतकऱ्यांशी संवाद

औरंगाबाद, दिनांक 20 : वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी पैठण तालुक्यातील मुरमा आणि औरंगाबाद तालुक्यातील पिंपळगाव या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन थेट शेतकर्‍यांशी...

प्रथमच देशात करण्यात आली हिंगाची लागवड

नवी दिल्ली : भारतातील जवळजवळ सर्वच घरांमध्ये आवर्जून आढळणा-या मसाल्याच्या पदार्थांपैकी एक म्हणजे हिंग. मात्र तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल पण भारतीय जेवणाचा अविभाज्य भाग...

राहुल गांधींनी त्या बहिणींना दिला न्याय

वायनाड : काँग्रेस नेते आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी आपल्या मतदारसंघाच्या दौ-यावर आहेत. यावेळी त्यांनी सर्वस्व गमावलेल्या दोन बहिणींना घराच्या चाव्या सुपूर्त केल्या. या...

भारताविरुध्द इसिस चा कट उघडकीस

नवी दिल्ली : भारताविरूद्ध सुरू असलेला आयएसआयएस आतंकवादी संघटनेचा मोठा प्लॅन उघडकीस आला असून, आयएसआयएस आतंकवादी संघटनेचे एक द्वेषपूर्ण डिजिटल मासिक हाती लागले आहे. भारताविरूद्ध...

केंद्राकडे बोट दाखविणे म्हणजे सरकारचा नाकर्तेपणा

उस्मानाबाद : राज्य सरकारमध्ये तीन पक्ष असल्याने प्रचंड मतभेद आहेत. परंतू कांही ही झाले तरी केंद्र सरकारकडे बोट दाखविले जाते. राज्यात अतिवृष्टीमुळे शेतीसह सर्वकांही...

आणखीन बातम्या

दोन आणि तीन पदरी मास्क ३ ते ४ रुपयांना मिळणार : राजेश टोपे

मुंबई : कोरोना साथ आटोक्यात आणण्यासाठी महत्वाचा घटक असलेल्या मास्कची किंमत निश्चित करून योग्य त्या किमतीत नागरिकांना मास्क मिळावे यासाठी पुढाकार घेणारे राज्य म्हणून...

मराठी भाषेचा ऍमेझॉन ऍपमध्ये समावेश

मुंबई : ऑनलाइन शॉपिंगसाठी प्रसिद्ध असलेले ऍमेझॉन ऍप आता मनसेच्या इशा-यापुढे नमले आहे. कारण ऍमेझॉन ऍपमध्ये मराठी भाषेचा समावेश केला जाणार आहे. ऍमेझॉन ही...

शेतक-यांच्या दु:खाचे होऊ नये हसू!

हे वर्ष जगाच्या इतिहासात मानवाचे सत्व पाहणारे वर्ष म्हणूनच नोंदविले जाईल, यावर आता राज्यापुरते तरी शिक्कामोर्तबच झाले आहे. अगोदर कोरोनाने सगळा देश ठप्प करून...

प्रथमच देशात करण्यात आली हिंगाची लागवड

नवी दिल्ली : भारतातील जवळजवळ सर्वच घरांमध्ये आवर्जून आढळणा-या मसाल्याच्या पदार्थांपैकी एक म्हणजे हिंग. मात्र तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल पण भारतीय जेवणाचा अविभाज्य भाग...

राहुल गांधींनी त्या बहिणींना दिला न्याय

वायनाड : काँग्रेस नेते आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी आपल्या मतदारसंघाच्या दौ-यावर आहेत. यावेळी त्यांनी सर्वस्व गमावलेल्या दोन बहिणींना घराच्या चाव्या सुपूर्त केल्या. या...

भारताविरुध्द इसिस चा कट उघडकीस

नवी दिल्ली : भारताविरूद्ध सुरू असलेला आयएसआयएस आतंकवादी संघटनेचा मोठा प्लॅन उघडकीस आला असून, आयएसआयएस आतंकवादी संघटनेचे एक द्वेषपूर्ण डिजिटल मासिक हाती लागले आहे. भारताविरूद्ध...

चीनला ४० हजार कोटींचा फटका

नवी दिल्ली : दिवाळी अवघ्या महिनाभरावर आली आहे. करोना संकट आणि निर्बंधामुळे अजूनही बाजारात लगबग सुरु झालेली नाही. तरीही याच दिवाळीत चीनचे मात्र दिवाळे...

रब्बी हंगामात अखंडित वीजपुरवठा करणार ! ऊर्जामंत्री नितीन राऊत

मुंबई, दि. २०(प्रतिनिधी) येत्या रब्बी हंगामात प्रामुख्याने कृषिपंपांना अखंडित वीजपुरवठा होईल, अशी ग्वाही राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली. राज्याचे वीजक्षेत्र सध्या प्रतिकूल...

अतिवृष्टीमुळे खराब झालेल्या रस्ते व पुलांची तातडीने दुरुस्ती करा !

मुंबई, दि.२० (प्रतिनिधी) मुसळधार पावसामुळे शेती व घरांबरोबरच रस्त्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. पुरामुळे रस्ते आणि पूलही वाहून गेले आहेत. त्यामुळे अशा रस्त्यांचे आणि...

प्लाझ्मा थेरपी परिणामकारक नाही

नवी दिल्ली : कोरोना रुग्णांवर करण्यात येणारी प्लाझ्मा थेरपी परिणामकारक नसल्याची माहिती आयसीएमआर कडून देण्यात आली आहे. लवकरच कोरोना रुग्णांसाठी ठरवलेल्या राष्ट्रीय आरोग्य उपचार...
1,308FansLike
118FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...