28.8 C
Latur
Saturday, February 4, 2023
Homeक्रीडाराजस्थानने आव्हान राखले; चेन्नईच्या आशा धूसर

राजस्थानने आव्हान राखले; चेन्नईच्या आशा धूसर

एकमत ऑनलाईन

सोमवारच्या सामन्‍यात चेन्नईला फटकेबाजी करता आली नाही त्यांचे फक्त पाच गडी बाद झाले ते सव्वाशे धावात त्यामुळे राजस्थानला फलंदाजीमध्ये घाई गडबड करण्याची गरज लागली नाही आणि त्यांनी शांतपणे सामना खिशात घातला यंदाच्या आयपीएलमघील पहिल्या निचांकी धावसंख्येचा पाठलाग करताना राजस्थानने अबूधाबी वर १७.३ षटकांतच चेन्नईचा ७ गडी व पंधरा चेंडू राखून पराभव केला राजस्थानने(आठ गूण) अखेरच्या स्थानावरून थेट पाचव्या स्थानावर झेप घेतली. आणि आपले पहिल्या चारात येण्याचे आव्हान कायम राखले.

उरलेल्या चारही सामन्यात विजय मिळवल्यास राजस्थानला बाद फेरी गाठण्याची आशा आहे. पण या पराभवाने चेन्नईचा(सहा गूण) पाय आणखी खोलात गेला. दोन्ही संघांचे दहा-दहा सामने झालेत आता फक्त चारच सामने खेळावयाचे शिल्लक आहेत धोनीच्या चेन्नई संघाने चारही सामने जिंकले तरी त्यांचे चौदाच गूण होतील व जिंकलेल्या इतर संघांचे पराभव होण्याची वाट पाहावी लागेल त्यामुळे आयपीएल ट्वेंटी-ट्वेंटी मधील चेन्नईचे आव्हान जवळजवळ धूसर झाले आहे राजस्थानच्या या विजयामुळे मात्र आशा पल्लवित झाल्यात त्यांनाही चारी सामन्यात विजय मिळवावा लागेल पाहूया घोडामैदान जवळच आहे

खेळपट्टी संथ झालीम्हणून धोनीने प्रथम फलंदाजी स्वीकारली पण त्याचा फायदा फलंदाजांना उठवता आला नाही चेन्नईला ५ बाद १२५ धावसंख्येत रोखले.चेन्नईने पॉवर प्लेच्या सुरवातीला फाफ डु प्लेसीला गमावले, तो संपताना शेट वॉटसनने त्यांची साथ सोडली. सलामीला परत एकदा बढती मिळाल्यावर सॅम करन खेळपट्टीवर टिकून होता. अंबाती रायुडू त्याच्या साथीला आला. दोघांनी तग धरला खरा,पण त्यांच्या खेळात आत्मविश्वास नव्हता. दहाव्या षटकापर्यंत हे दोघेही बाद झाले. राजस्थानच्या गोलंदाजांमध्ये कमालीची अचूकता होती. विशेषतः श्रेयस गोपाल व राहुल तिवाटीया च्या फिरकीने केवळ ३२ धावा दिल्या. सर्वात महत्वाचे म्हणजे क्षेत्ररक्षकांची साथ मिळाल्यामुळे चेन्नईच्या फलंदाजांवरील दडपण वाढले होते. कर्णधार धोनी आणि रवींद्र जडेजा एकत्र आले.या जोडीने घसरलेला चेन्नईचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्यांनी ४५ चेंडूत ५१ धावा जोडल्या. पण, त्यांना डावाला आवश्यक वेग देता आला नाही.

चेन्नईला शंभरी गाठता येणार की नाही याची भिती या जोडीने दूर केली. धोनी धावबाद झाल्यावर आता चेन्नईचा डाव किती लांबणार याची भिती वाटत होतीच. जडेजाच्या साथीत खेळायला आलेल्या पुण्यातील केदार जाधवला आक्रमक होता आले नाही. जडेजाने धडपड केली. त्यामुळे चेन्नईला सव्वाशेची मजल तरी मारता आली. त्यांनी २० षटकांत केवळ १२ चौकार मारले. यातील सहा चौकार पहिल्या पाच षटकांतील होते. म्हणजे पुढच्या पंधरा षटकांत त्यांना केवळ पाचच चौकार मारता आले .कमी धावसंख्येवर चेन्नईला रोखल्याचे राजस्थानला विजय मिळाल्यान समाधान मिळाले

धावगती वाढविण्यासाठी राजस्थान मैदानात उतरले आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानकडून आक्रमक फलंदाजी अपेक्षित होती बेन स्टोक्सच्या स्ट्रोकफूल खेळीने त्यांना वेगवान सुरवात मिळाली. पण, क्रिकेटच ते. बिनबाद २६ अशा तीन षटकातील सुरवातीनंतर राजस्थानला दीपक चहरने एकामागून एक धक्के देत त्यांची अवस्था ३ बाद २८ अशी केली चेन्नईला कंबर कसण्याची संधी होती. बटलर आणि कर्णधार स्टिव स्मिथ यांनी ही संधी त्यांना मिळू दिली नाही बटलरचा आक्रमकपणा आणि स्मिथच्या संयमाची जोड मिळाल्याने राजस्थानचा विजय साकार झाला. या जोडीने नाबाद ९८ धावांची भागीदारी केली. बटलर ४८ चेंडूंत ७ चौकार, २ षटकारांचा तडाखा देत ७० धावांवर नाबाद राहिला. स्मिथने ३४ चेंडूंत नाबाद २६ धावा केल्या. कर्णधाराची जबाबदारी ओळखून एक बाजू लावून धरण्याचे काम केले राजस्थान तर्फे ही १२ चौकार व २ षटकार खेचले गेले

डॉ.राजेंद्र भस्मे

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अतिवृष्टी भागाची पाहणी करून आमदार राजेंद्र राऊत यांच्या कार्यालयास धावती भेट

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या