23.4 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeक्रीडामहाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदी रामदास तडस

महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदी रामदास तडस

एकमत ऑनलाईन

वर्धा : महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद निवडणूक बिनविरोध झाली असून भाजप रामदास तडस यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदासाठी तीन जणांनी अर्ज केले होते.

परंतु, काकासाहेब पवार आणि धवलसिंह मोहिते पाटील यांनी अर्ज मागे घेतल्याने रामदास तडस यांची बिनविरोध अध्यक्षपदी निवड करण्यात आली. यामुळे महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेवर आता भाजपचा नेता असणार आहे.

यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आतापर्यंत महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष होते. शरद पवार अध्यक्ष असताना कुस्तीगीर परिषद बरखास्त झाली होती.

रामदास तडस यांचा परिचय
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या रामदास तडस यांनी काँग्रेसच्या सागर मेघे यांचा २ लाखांहून अधिक मतांनी पराभव केला होता. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मेघे कुटुंबीयाने भाजपमध्ये प्रवेश केला होता. रामदास तडस हे वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली या विधान परिषदेतून दोनदा आमदार झाले. तसेच रामदार तडस नगर परिषदेचे अध्यक्षही होते.

त्यानंतर २००९ मध्ये विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून एसटी महामंडळाचे संचालकपदही भूषवले आहे. त्यानंतर २०१४ मध्ये ते भाजपाच्या तिकिटावर खासदार म्हणून निवडून आले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या