27 C
Latur
Saturday, August 13, 2022
Homeक्रीडामध्य प्रदेशने मुंबईला हरवून रचला इतिहास

मध्य प्रदेशने मुंबईला हरवून रचला इतिहास

एकमत ऑनलाईन

मध्य प्रदेश संघाचा चमत्कार, रणजी सामन्यात विजेतेपदावर कोरले नाव
मुंबई : आजचा दिवस मध्य प्रदेश क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा दिवस आहे. आज २६ जून रोजी मध्य प्रदेशचा संघाने चमत्कार आहे, जो आजपर्यंत या राज्याच्या संघाने यापूर्वी कधीही केला नव्हता. मुंबईविरुद्ध २०२१-२२ हंगामाच्या अंतिम सामन्यात मध्य प्रदेशने बाजी मारली आणि रणजीच्या पहिल्या विजेतेपदावर नाव कोरले. मध्य प्रदेशला १०८ धावांचे लक्ष्य मिळाले होते, जे त्यांनी हिमांशू मंत्री, रजत पाटीदार आणि शुभम शर्माच्या खेळीच्या जोरावर चार गडी गमावून गाठले. संघाने यापूर्वी होळकरांच्या नावाखाली संघाने १९५२-५३ मध्ये विजेतेपद पटकावले होते.

मध्य प्रदेशने १९५०-५१ पासून संघ म्हणून स्पर्धेस सुरुवात केली. मात्र आजपर्यंत संघाला हे विजेतेपद मिळवता आलेले नाही. १९९८-९९ च्या हंगामात मध्य प्रदेश जेतेपदाच्या जवळ पोहोचला होता. त्यांनी कर्नाटकविरुद्ध पहिल्या डावात आघाडी घेतली आणि विजेतेपदासाठी त्यांना फक्त ड्रॉ खेळण्याची गरज होती पण शेवटच्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात पाच षटके शिल्लक असताना त्यांना पराभव पत्करावा लागला आणि त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. त्यानंतर २०२१ च्या हंगामात मध्य प्रदेशने उपांत्य फेरीत बंगालचा १७४ धावांनी पराभव करून १९९८-९९ नंतर पहिली रणजी अंतिम फेरी गाठली. मात्र, आता तब्ब्ल ७२ वर्षांनंतर मध्य प्रदेश संघाने स्पर्धेच्या सर्वात यशस्वी मुंबई टीमवर मात केली आणि प्रथमच रणजीच्या विजेतेपदाला गवसणी घातली. मुंबईने आतापर्यंत ४१ वेळा रणजीचा किताब जिंकला असून त्यांचे ४२ व्यांदा जेतेपदाचे स्वप्न फायनलमध्ये भंगले.

सरफराज खानने केला कहर
मुंबई संघाचा मधल्या फळीतील फलंदाज सरफराज खानने रणजी ट्रॉफी २०२२ मध्ये मुंबईसाठी ९८२ धावा करण्यात यश मिळवले आणि संघाला अंतिम फेरीत नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने रणजी ट्रॉफीच्या या मोसमातत ६ सामन्यांच्या ९ डावात एका दुहेरी शतकासह चार शतके आणि दोन अर्धशतके झळकावली.सरफराजशिवाय मुंबईसाठी यशस्वी जैस्वालने ४९८ धावा केल्या. अशा परिस्थितीत सरफराज व यशस्वी वगळता इतर फलंदाजांनी मुंबईची जबाबदारी स्वीकारली नाही, असे स्पष्टपणे म्हणता येईल.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या