नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियात काही महिन्यांत होणा-या टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया संघबांधणीच्या तयारीला लागली आहे. सध्या संघ व्यवस्थापन विविध टीम कॉम्बिनेशन चाचपून पाहत आहे. दरम्यान, भारताचे माजी फलंदाज आणि समालोचक संजय मांजरेकर यांनी रवींद्र जडेजाला पुन्हा डिवचले.
त्यांच्या मते रवींद्र्र जडेजाला टी-२० वर्ल्डकप संघात स्थान मिळणे खूप अवघड आहे. संजय मांजरेकर म्हणतात की, गेल्या काही दिवसांमध्ये दिनेश कार्तिकने दाखवून दिले आहे की, तो भारतासाठी ६ किंवा ७ व्या क्रमांकावर चांगल्या प्रकारे फलंदाजी करू शकतो. टी-२० क्रिकेटमध्ये त्याने आपल्या खेळीमुळे सर्वांना प्रभावित केले आहे.
मांजरेकर पुढे म्हणाले की, रवींद्र्र जडेजासारख्या अष्टपैलू खेळाडूला आता टी-२० संघात स्थान मिळवणे कठीण झाले आहे. अक्षर पटेलसारखा खेळाडू जडेजाच्या पुढे चालला आहे. संघात हार्दिक पांड्या देखील परत आला आहे. दिनेश कार्तिक देखील आहे. याचबरोबर मधल्या फळीत ऋषभ पंत देखील आहे. रवींद्र्र जडेजाबाबत बोलायचे झाले तर त्याला संघात सहजासहजी जागा मिळणार नाही.