30.6 C
Latur
Friday, May 14, 2021
Homeक्रीडाआरसीबीची विजयी सलामी

आरसीबीची विजयी सलामी

एकमत ऑनलाईन

चेन्नई : यावर्षीच्या आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सला पराभवाचा धक्का बसला आहे. आरसीबीच्या संघाने यावेळी दमदार कामगिरी करत विजयी सलामी दिली. मुंबई इंडियन्सने आरसीबीपुढे विजयासाठी १६० धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा लीलया पाठलाग करत आरसीबीने विजय साकारत दोन गुणांची कमाई केली.

आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. त्यामुळे प्रथम फलंदाजी करीत मुंबई इंडियन्सने १५९ धावा केल्या. त्यानंतर मैदानात उतरलेल्या आरसीबीचा सलामीवीर वॉशिंग्टन सुंदर पहिल्याच चेंडूवर झेलबाद होता होता राहिला. रोहित शर्माने झेल सोडत त्याला जीवदान दिले. पण त्यानंतर सुंदर आणि कर्णधार विराट कोहली यांनी ३६ धावांची सलामी दिली. पण कृणाल पांड्याने सुंदरला बाद केले. त्यानंतर विराट कोहलीने आक्रमक फलंदाजी करत संघाची धावगती चांगलीच वाढवली. त्याला ग्लेन मॅक्सवेलची चांगली साथ मिळाली. कोहली आणि ग्लेन मॅक्सवेलने अर्धशतकी भागीदारी रचली.

जसप्रीत बुमराहने विराटला बाद करत ही भागीदारी तोडली. विराटने ४ चौकारांसह ३३ धावा केल्या. विराट बाद झाल्यानंतर मॅक्सवेलही मैदानावर जास्त वेळ थांबू शकला नाही. जलदगती गोलंदाज जानसेनने त्याला झेलबाद केले. मॅक्सवेलने ३ चौकार आणि २ षटकारांसह ३९ धावा केल्या. याच षटकात जानसेनने शाहबाझ अहमदला बाद करत बंगळुरूला अजून संकटात टाकले. त्यानंतर मैदानात आलेला डॅन ख्रिश्चनही काही खास कामगिरी करू शकला नाही. बुमराहने त्याला स्वस्तात बाद केले. मात्र, त्यानंतर एबी डिव्हिलियर्सने एकट्याने मोर्चा सांभाळत बुमराह, बोल्टवर आक्रमण केले आणि आरसीबीला विजय मिळवून दिला.

तत्पूर्वी मुंबईचे रोहित शर्मा आणि ख्रिस लीन या फलंदाजांची जोडी सलामीसाठी मैदानात आली. पहिल्या दोन षटकात बंगळुरूच्या गोलंदाजांनी रोहित-लिनला हात खोलूू दिले नाहीत. मात्र, तिस-या षटकात रोहितने सिराजला यंदाच्या हंगामातील पहिला चौकार खेचला. रोहित मोठी धावसंख्या उभारणार असे वाटत असताना तो धावबाद झाला. युजर्वेंद्र चहलच्या गोलंदाजीवर चोरटी धाव घेताना रोहित वैयक्तिक १९ धावांवर माघारी परतला. पहिल्या पाच षटकात मुंबईने १ बाद ३० धावा उभारल्या. रोहितनंतर आलेल्या सूर्यकुमारने लिनला हाताशी घेत संघासाठी अर्धशतकी भागीदारी रचली.

बंगळुरूचा गोलंदाज काईल जेमीसनने सूर्यकुमारला यष्टीमागे झेलबाद करत मुंबईला दुसरा धक्का दिला. सूर्यकुमारने ३१ धावांची खेळी केली. सूर्यकुमारनंतर लिनही तंबूत परतला. फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदरने त्याला अर्धशतक करू दिले नाही. लिनने ४ चौकार आणि ३ षटकारांसह ४९ धावा केल्या. बंगळुरूने स्थिरावलेल्या सूर्यकुमार-लिनला बाद केल्यानंतर हार्दिक पंÞड्या आणि ईशान किशनची जोडी मैदानात आली.

मात्र, वेगवान गोलंदाज हर्शल पटेलने हार्दिकला पायचित पकडत मुंबईला चौथा धक्का दिला. त्यानंतर हर्षलने किशनला वैयक्तिक २८ धावांवर माघारी धाडत आपला दुसरा बळी घेतला. त्यानंतर आरसीबीने मुंबईच्या फलंदाजांना जास्त फटकेबाजी करू दिली नाही. हर्षलने शेवटच्या षटकात कृणाल पंड्या आणि कायरन पोलार्डला लागोपाठ चेंडूवर बाद केले. याच षटकात हर्षलने जानसेनला यॉर्कर टाकत आपले ५ बळी पूर्ण केले. बंगळुरूकडून हर्षलने टाकलेल्या या शेवटच्या षटकात मुंबईला एकच धाव मिळाली.

दहावी, बारावी परीक्षांबाबत पर्यायावर विचार, विद्यार्थ्यांनी अभ्यास सुरू ठेवावा, योग्य वेळी निर्णय घेणार : गायकवाड

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,495FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या