28.8 C
Latur
Saturday, February 4, 2023
Homeक्रीडाअबुबाकरला ‘रेड कार्ड’

अबुबाकरला ‘रेड कार्ड’

एकमत ऑनलाईन

कतार : शुक्रवारी रात्री झालेल्या सामन्यात गोल करणा-या अबुबाकरने जल्लोषाच्या नादात अंगातील टी शर्ट काढून हवेत फिरविला आणि त्याच क्षणी पंचांनी त्याला रेड कार्ड दाखवत मैदानाबाहेरचा रस्ता दाखविला आहे. दरम्यान फिफा विश्वचषक २०२२ च्या शेवटच्या गट सामन्यात मोठा अपसेट पाहिला मिळाला. येथे कॅमेरूनने ब्राझीलचा रोमहर्षक पराभव केला. संपूर्ण ९० मिनिटे ०-० अशी बरोबरी असताना दुखापतीच्या वेळेत (९०+२ मिनिटे) गोल करण्यात आला.

कॅमेरूनच्या अबुबाकरने हा गोल केला. या गोलच्या जोरावर कॅमेरूनने ब्राझीलवर १-० असा विजय मिळवला. मात्र, या मोठ्या विजयानंतरही कॅमेरूनचा संघ पुढील फेरीसाठी पात्र ठरू शकला नाही.

बलाढ्य ब्राझीलला पराभूत केल्यानंतर कॅमेरूनने इतिहास रचला. फिफा विश्वचषकात ब्राझीलला पराभूत करणारा तो पहिला आफ्रिकन संघ ठरला. उत्तरार्धात ब्राझीलच्या गोलपोस्टवर सतत धडका देणा-या कॅमेरूनला अगदी ९० व्या मिनिटाला गोल करण्यात यश आले. उजव्या बगलेतून चेंडू घेऊन सुसाट सुटलेल्या नोगम बँकलीने उंचावर थेट डीच्या मध्यभागी पास दिला. ब्राझीलच्या तीन रक्षकांमध्ये घुसत अबुबाकरने त्यांच्या देशासाठी संस्मरणीय गोल गेला आणि तोच त्यांच्या विजयासाठी पुरेसा ठरला.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या