22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeक्रीडापंतऐवजी कार्तिकला संधी देण्याचा निर्णय योग्य

पंतऐवजी कार्तिकला संधी देण्याचा निर्णय योग्य

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली :
ऋषभ पंतने कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. पंतची कामगिरी चांगली आहे. पण टी-२० फॉरमॅटमध्ये तो तितकी चांगली कामगिरी करू शकला नाही. दिनेश कार्तिकचा आलेख चढता आहे. कार्तिकने चांगला खेळ दाखवला आहे. ऋषभ पंतऐवजी दिनेश कार्तिकला संघात खेळवण्याचा रोहित शर्माचा निर्णय योग्य आहे. असे हरभजन सिंगने म्हटले आहे.

भारताने पाकिस्तानविरुद्ध सामना जिंकून आशिया चषकाच्या मोहिमेला सुरुवात केली आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने युवा यष्टीरक्षक ऋषभ पंत ऐवजी दिनेश कार्तिकला प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी दिली. रोहित शर्माच्या या निर्णयावर चाहत्यांपासून तर दिग्गज क्रिकेटपटूंपर्यंत सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले.

मात्र, भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगने रोहित शर्माचा निर्णय योग्य असल्याचे म्हटले आहे. दिनेश कार्तिकच्या चांगल्या फॉर्मचा भारतीय संघाने चांगला वापर केला पाहिजे, असेही हरभजन सिंगने म्हटले आहे.

आयपीएलच्या पंधराव्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने दिनेश कार्तिकवर बोली लावत त्याला संघात सामील करून घेतले. या हंगामात दिनेश कार्तिकने बंगळुरूच्या अनेक विजयांत महत्त्वाचा वाटा उचलला. या हंगामात त्याने १८३ च्या स्ट्राईक रेटने ३३० धावा केल्या.

कार्तिकचा जबरदस्त फॉर्म पाहता त्याची पुन्हा एकदा भारतीय संघात निवड झाली. एवढेच नव्हे तर, टी-२० फॉरमॅटमध्ये पंतच्या तुलनेत दिनेश कार्तिकने चांगली कामगिरी करून दाखवली आहे. महत्त्वाचे म्हणजे, ऑस्ट्रेलियात येत्या ऑक्टोबरमध्ये रंगणा-या आगामी टी-२० विश्वचषकातही दिनेश कार्तिकची फर्स्ट चॉईस विकेटकीपर म्हणून निवड होण्याची शक्यता आहे.

कार्तिकला संघाबाहेर ठेवणे चुकीचे
कार्तिकचा सध्याचा फॉर्म पाहता त्याला संघाबाहेर ठेवले जाऊ शकत नाही. सध्या कार्तिकला संधी देणे गरजेचे आहे. पंतजवळ खूप वेळ आहे. पण कार्तिकजवळ फक्त एक किंवा दोन वर्षांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. त्याच्याकडे खालच्या क्रमांकावर फलंदाजी करत भारताला विजय मिळवून देण्याची क्षमता आहे, असेही हरभजन सिंगने म्हटले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या