22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeक्रीडाभारत-पाक सामन्याआधी ट्विटरवर दंगल...

भारत-पाक सामन्याआधी ट्विटरवर दंगल…

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : आशिया चषक २०२२ मध्ये टीम इंडिया कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे. आज २८ ऑगस्टला संध्याकाळी ७.३० वाजता दोन्ही संघ दुबईत आमने-सामने येणार आहेत.

सामन्याआधी सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये जल्लोष सुरू झाला आहे. सोशल मीडियावर फनी मीम्सही बनवले जात आहेत, जे प्रचंड व्हायरल होत आहेत. आता सर्वांत मोठ्या दंगलीची पाळी आली आहे, असे अनेक चाहत्यांनी लिहिले आहे.

टीम इंडियाचा माजी क्रिकेटर वसीम जाफरनेही एक दमदार व्हीडीओ ट्विट केले आहे, ज्यामध्ये तो सोशल मीडियावर भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी चाहते आपापसांत कसे भांडत आहेत हे दाखवत आहे. सोशल मीडियावर कोणत्या प्रकारचे फनी मीम्स बनवले गेले आहेत, ते तुम्ही येथे पाहू शकता.

टी-२० विश्वचषकानंतर दोन्ही संघांमधील हा पहिला सामना आहे. दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत पाकने भारताचा पराभव केला होता, त्याच मैदानावर आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत आज पुन्हा भारत-पाक सामना होत आहे. अशा परिस्थितीत आता टीम इंडियाला त्या पराभवाचा बदला घेण्याची संधी आहे.

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), के. एल. राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, यझुवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग आणि आवेश खान.

पाकिस्तान : बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, फखर झमान, हैदर अली, हारिस रॉफ, इफ्तेकार अहमद, शुशादिल शाह, महम्मद नवाझ, महम्मद रिझवान, हसन अली, नसीम शाह, शहनवाझ दहानी, उस्मान कादिर आणि महम्मद हसनैन.
…..

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या