मुंबई : भारतीय संघाचा युवा स्टार क्रिकेटपटू ऋषभ पंत याच्याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. अपघाताच्या तब्बल एक महिन्यानंतर ऋषभ पंत याला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात येणार आहे. सध्या पंत मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात उपचार घेत असून त्याच्या प्रकृतीत चांगली सुधारणा होत आहे.
३० डिसेंबर रोजी दिल्ली येथून आपल्या घरी जात असताना ऋषभ पंत याच्या कारला भीषण अपघात झाला होता. या अपघातात ऋषभ गंभीर जखमी झाल्याने त्याला डेहराडूनच्या मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र पायावर लिगामेंट सर्जरी करण्यासाठी त्याला एअरलिफ्ट करून मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
बीसीसीआयकडून ऋषभच्या प्रकृतीवर काळजीपूर्वक लक्ष ठेवण्यात येत आहे.
लिगामेंट सर्जरी यशस्वी झाली असून पंत उपचारांना देखील योग्य प्रतिसाद देत आहे. अशातच आता त्याच्या डिस्चार्जबाबत माहिती समोर आली आहे. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिका-याने सूत्रांना दिलेल्या माहितीनुसार पंतला या आठवड्यात डिस्चार्ज देण्यात येणार आहे.