23.7 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeक्रीडाकसोटी क्रमवारीत ऋषभ पंतची मोठी झेप; कोहली टॉप-१० मधून बाहेर

कसोटी क्रमवारीत ऋषभ पंतची मोठी झेप; कोहली टॉप-१० मधून बाहेर

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा आणि रिशेड्युल सामन्यानंतर आयसीसीने नुकतीच कसोटी क्रमवारिका जाहीर केली आहे. ताज्या क्रमवारीनुसार, भारताचा अष्टपैलू खेळाडू ऋषभ पंत टॉप-१० मध्ये एन्ट्री करण्यास यशस्वी ठरला आहे. त्याने उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर आयसीसी कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत सर्वोच्च स्थान मिळवले आहे. त्याने दहाव्या स्थानावरून पाचव्या स्थानावर झेप घेतली.

तर, भारताविरुद्ध दोन शतकं झळकावणारा जॉनी बेरअस्टो १३ स्थानांची झेप घेत दहाव्या क्रमांकावर पोहोचला. बेअरस्टोनं त्याच्या कारकीर्दीतील मागच्या तीन कसोटी सामन्यांत चार शतकं ठोकली आहेत. महत्त्वाचे म्हणजे, भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली तब्बल सह वर्षांनंतर टॉप-१० मधून बाहेर झाला आहे.

इंग्लंडविरुद्ध बर्मिंगहॅम कसोटी सामन्यात ऋषभ पंतने पहिल्या डावात १११ चेंडूंत १४६ धावा केल्या होत्या. त्यानंतर दुस-या डावातही ५७ धावांची खेळी केली होती. त्याने मागील सहा कसोटी सामन्यांत दोन शतके आणि तीन अर्धशतके झळकावली आहेत. त्याने उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर आयसीसी कसोटी फलंदाजांच्या क्रमावारीत सर्वोच्च स्थान मिळवले. त्याने दहाव्या स्थानावरून पाचव्या स्थानावर झेप घेतली.

विराटची तीन स्थानांनी घसरण
इंग्लंडविरुद्ध कसोटी सामन्यात विराट कोहलीला पहिल्या डावात ११ तर, दुस-या डावात २० धावा करता आल्या. त्यामुळे कोहलीची ७१४ रेटिंगसह तीन स्थानांनी घसरण झाली असून तो आता १३व्या क्रमांकावर गेला आहे. कोरोनामुळे बर्मिंगहॅम कसोटी सामन्यातून बाहेर पडलेला रोहित शर्मा नवव्या स्थानावर घसरला आहे. तर गेल्या पाच डावांत चार शतके झळकावणारा इंग्लंडचा जॉनी बेअरस्टो ११स्थानांनी झेप घेत दहाव्या स्थानावर पोहोचला आहे.

जो रूट कसोटी क्रिकेटचा बादशहा
आयसीसी कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूट अव्वल स्थानी आहे. बर्मिंगहॅम कसोटी सामन्यातील चौथ्या डावात त्याने नाबाद १४२ धावांची खेळी केली होती. त्याने आपल्या कारकीर्दीतील सर्वोच्च ९२३ रेटिंग मिळवले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या