24.2 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeक्रीडारॉजर फेडरर सर्वात श्रीमंत खेळाडू

रॉजर फेडरर सर्वात श्रीमंत खेळाडू

एकमत ऑनलाईन

फोर्ब्ज २०२०च्या यादीत विराट ६६व्या स्थानावर

न्यूयॉर्क : ‘फोर्ब्ज’ने २०२० या वर्षाच्या जगातील टॉप १०० श्रीमंत खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर जगातील सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू बनला. ३८ वर्षीय फेडररने गेल्या वर्षी १०६ मिलियन डॉलर (जवळपास ८०२ कोटी रु.) कमाई केली. त्याने यात ७५५ कोटी रुपये केवळ जाहिरातीतून कमावले, इतर बक्षीस रक्कम व इतर गोष्टीतून. फेडररने लियोनेल मेस्सीला मागे सोडले. फेडरर ‘फोर्ब्ज’च्या सर्वाधिक कमाईच्या अव्वल १०० खेळाडूंच्या यादीत पहिल्या स्थानी पोहोचणारा पहिला टेनिसपटू बनला. तो १९९० पासून सुरू झालेल्या यादीत अव्वल स्थानी पोहोचणारा नववा खेळाडू ठरला. फेडररने उत्पन्नामध्ये नामांकित फुटबॉलपटूंना मागे टाकले आहे. गेल्या वर्षी तो पाचव्या स्थानावर होता.

अव्वल १०० खेळाडूंची वर्षाची कमाई एकूण ३.६ बिलियन डॉलर (२७ हजार १८८ कोटी रुपये) आहे, जी गेल्या वेळेपेक्षा ९ टक्क्यांनी कमी आहे. २०१६ नंतर पहिल्यांदा कमाईत घसरण झाली. ‘फोर्ब्ज’च्या यादीत पोर्तुगालचा फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो (१०५ मिलियन डॉलर), लियोनेल मेस्सी (१०४ मिलियन डॉलर), नेमार (९५.५ मिलियन डॉलर) आणि अमेरिकेचा बास्केटबॉलपटू लेब्रॉन जेम्स (८८.२ मिलियन डॉलर) हे अव्वल पाच स्थानावर आहेत. दरम्यान, ‘फोर्ब्ज’ १९९० पासून श्रीमंतांची यादी जाहीर करत आहे.

Read More  आनंद मायदेशी परतला!

श्रीमंत खेळाडूंच्या यादीत विराट एकमेव भारतीय
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याने वर्षभरात १९६ कोटी रुपयांची कमाई करून या वर्षात सर्वांत जास्त उत्पन्न मिळवणाºया खेळाडूं्च्या ‘फोर्ब्ज’ मॅग्झिनच्या यादीमध्ये अव्वल १०० खेळाडूंमध्ये स्थान पटकावले आहे विराट या यादीत एकमात्र भारतीय खेळाडू आहे. विराट या १०० श्रीमंत खेळाडूंच्या यादीमध्ये ६६ व्या स्थानावर आहे. त्याने मागील वर्षभरात २६ मिलियन डॉलर म्हणजे जवळपास १९७ कोटी रुपयांची कमाई केली आहे. २०१९ मध्ये तो १०० व्या तसेच २०१८ ला ८३ व्या स्थानावर होता. विराटने २.४ कोटी डॉलर जाहिराती आणि ब्रॅण्ड या माध्यमातून तर २० लाख डॉलरची कमाई वेतन आणि पुरस्कारातून केली आहे. मागील वर्षी त्याने २.५ कोटी डॉलर तर त्याआधी २.४ कोटी डॉलर कमावले होते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या