26.8 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeक्रीडारोहित शर्माची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील १५ वर्षे पूर्ण

रोहित शर्माची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील १५ वर्षे पूर्ण

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारताचा कर्णधार रोहित शर्मासाठी आजचा दिवस खूप खास आहे. आजच्या दिवशी १५ वर्षांपूर्वी रोहित शर्माने भारताकडून आयर्लंडविरुद्ध त्याच्या कारकीर्दीतील पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. यासंदर्भात नुकतेच रोहित शर्माने ट्विट केले. तसेच भारतासाठी नेहमी चांगली कामगिरी करण्याचा त्याचा प्रयत्न राहील, असेही त्याने म्हटले आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील १५ वर्षांच्या प्रवासावर रोहित शर्माने केलेल्या ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, आजच्या दिवशी १५ वर्षांपूर्वी मी भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. हा एक प्रवास आहे जो मी नक्कीच आयुष्यभर जपत राहीन. या प्रवासाचा भाग असलेल्या सर्वांचे मी आभार मानू इच्छितो. मी भारतासाठी खेळावे म्हणून ज्यांनी मला मदत केली त्यांचे विशेष आभार. सर्व क्रिकेटप्रेमी, चाहते आणि समीक्षकांचे आभार, संघासाठी तुमचे प्रेम आणि समर्थन हेच ​​आम्हाला सर्व अडचणींवर मात करण्यास मदत करते.

रोहित शर्माची कारकीर्द
रोहित शर्माने आतापर्यंत ४५ कसोटी, २३० एकदिवसीय आणि १२५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने ९ हजार २८३, कसोटीत ३ हजार १३७ आणि टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ३ हजार ३१३ धावा केल्या आहेत. रोहितच्या नावावर कसोटीत ८, एकदिवसीय सामन्यात २९ आणि टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये चार शतकांची नोंद आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या