22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeक्रीडारोहित शर्माची पाकिस्तानी चाहत्याला ‘जादू की झप्पी’

रोहित शर्माची पाकिस्तानी चाहत्याला ‘जादू की झप्पी’

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : आशिया चषक सुरू होण्यापूर्वी सर्वच संघ सराव सत्रात घाम गाळत आहेत. दरम्यान, अनेक चाहते आपापल्या आवडत्या खेळाडूला भेटण्यासाठी तसेत त्याचा ऑटोग्राफ घेण्यासाठी धडपड करताना दिसत आहेत. भारतीय संघ यूएईमध्ये दाखल झाल्यापासून भारतीय क्रिकेटपटू आणि त्यांच्या चाहत्यांचे व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

यातच भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि त्याच्या पाकिस्तानी चाहत्याचा व्हीडीओ समोर आला आहे. या व्हीडीओत रोहित शर्मा चाहत्याला अनोख्या पद्धतीने मिठी मारताना दिसत आहे.

व्हायरल झालेल्या व्हीडीओमध्ये काही पाकिस्तानी चाहते लोखंडी जाळीच्या पलीकडे रोहित शर्माची वाट पाहत असल्याचे दिसत आहेत. रोहित त्यांच्याकडे पोहोचताच चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. यावेळी अनेक चाहत्यांनी त्याच्यासोबत सेल्फी काढले तर, एका चाहत्याने त्याला मिठी मारण्याची विनंती केली.

रोहितने उत्तर दिले की लोखंडी जाळीमुळे हे करणे कठीण आहे. परंतु, चाहत्याची धडपड पाहून रोहित शर्माने लोखंडी जाळीतूनच त्याला मिठी मारली. रोहित शर्माचा हा व्हीडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. तसेच या व्हीडीओला मोठी पसंती दर्शवली जात आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या