27 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeक्रीडासलग १३ टी-२० सामने जिंकण्याचा रोहीत शर्माचा विक्रम

सलग १३ टी-२० सामने जिंकण्याचा रोहीत शर्माचा विक्रम

एकमत ऑनलाईन

साऊथहम्पटन : इंग्लंड विरूद्धच्या पहिल्या टी २० सामन्यात भारताने ५० धावांनी विजय मिळवत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. या विजयात हार्दिक पांड्याने फलंदाजी पाठोपाठ गोलंदाजीत कमाल करीत मोठा वाटा उचलला. त्याने ५१ धावांची खेळी करीत ४ विकेटही घेतल्या. याचबरोबर कर्णधार रोहित शर्मानेदेखील कॅप्टन्सीचे एक वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केले. त्याच्या नेतृत्वात टीम इंडियाने आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात सलग १३ सामने ंिजकण्याचा पराक्रम केला आहे.

रोहित शर्माने अफगाणिस्तानच्या असगर अफगाणचे सलग १२ सामने ंिजकण्याचा विक्रम मागे टाकला. आता सलग टी २० आंतरराष्ट्रीय सामने जिंकणा-या कर्णधारांच्या यादीत १३ विजय मिळवणारा रोहित शर्मा अव्वल स्थानावर आहे. त्यानंतर अफगाणिस्तानच्या असगर अफगाण याचा दुसरा क्रमांक लागतो. त्या पाठोपाठ सलग ११ विजय मिळवणा-या रोमानियाचा रमेश सतीनस हा तिस-या क्रमांकावर आहे.

या सामन्यात भारताच्या विजयात हार्दिक पांड्याने सिंहाचा वाटा उचलला. त्याने ३३ चेंडूत ५१ धावांची अर्धशतकी खेळी केली. त्याचे हे टी २० क्रिकेटमधील पहिले अर्धशतक ठरले. याचबरोबर भारताकडून सूर्य कुमार यादवने ३९ तर दीपक हुड्डाने ३३ धावांची खेळी केली. इंग्लंडकडून ख्रिस जॉर्डन आणि मोईन अली यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या. भारताने २० षटकांत ८ बाद १९८ धावांपर्यंत मजल मारली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या