24.6 C
Latur
Sunday, October 24, 2021
Homeक्रीडाफिटनेस टेस्टमध्ये रोहित पास ऑस्ट्रेलियासाठी होणार रवाना

फिटनेस टेस्टमध्ये रोहित पास ऑस्ट्रेलियासाठी होणार रवाना

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : टीम इंडियाचा अनुभवी सलामीवीर रोहित शर्माने बंगळुरू येथील एनसीएमध्ये फिटनेस चाचणी पास केली असून भारतीय संघाची चिंता रोहित शर्मा तंदुरुस्त झाल्यामुळे मिटली आहे. आता रोहित शर्मा लवकरच ऑस्ट्रेलियासाठी रवाना होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. रोहितला ऑस्ट्रेलियात १४ दिवसांच्या विलगीकरणात रहावे लागणार आहे.

रोहितला ऑक्टोबर महिन्यात खेळवल्या गेलेल्या आयपीएल स्पर्धेदरम्यान मांडीचे स्नायू ताणले गेल्यामुळे काही साखळी सामन्यांना मुकावे लागले. त्यामुळेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० मालिकेसाठी रोहितची भारतीय संघात निवड करण्यात आली नव्हती. आता जवळपास एक महिना तंदुरुस्तीवर लक्ष दिल्यावर एनसीए चे प्रमुख राहुल द्रविड, फिजिओ आणि निवड समिती सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली रोहितची चाचणी झाली. रोहित शर्मा ही फिटनेस चाचणी पास झाला आहे.

पहिल्या दोन कसोटी सामन्याला १४ दिवसांच्या विलगीकरणामुळे रोहित शर्मा मुकणार आहे. रोहित शर्मा तिस-या कसोटी सामन्यापासून उपलब्ध असणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये १७ डिसेंबरपासून चार कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. कर्णधार विराट कोहली पहिल्या कसोटी सामन्यानंतर मायदेशी परतणार आहे. त्यामुळे विराट कोहलीच्या अनुपस्थितीत रोहित शर्मा आणि पुजारावर भारतीय संघाच्या फलंदाजीची मदार असेल. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणे संघाचे नेतृत्व करणार आहे.

एकतर्फी प्रेमातून आजी-नातवाची हत्या करणा-याची आत्महत्या

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या