24.6 C
Latur
Sunday, October 24, 2021
Homeक्रीडाअखेरच्या दोन कसोटींसाठी रोहित खेळणार

अखेरच्या दोन कसोटींसाठी रोहित खेळणार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : सलामीचा स्टार फलंदाज रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया दौ-यात भारतीय संघासोबत जुळण्यास सज्ज झाला आहे. तथापि अखेरच्या दोन सामन्यांत तो खेळू शकेल की नाही याचा निर्णय वैद्यकीय पथकाच्या परवानगीनंतरच होईल, अशी माहिती बीसीसीआयने शनिवारी दिली. तिस-या आणि चौथ्या कसोटीत रोहित खेळण्यास फिट आहे की नाही, हे बीसीसीआयचे वैद्यकीय पथक ठरवणार आहे.

यूएईत नुकत्याच झालेल्या आयपीएलदरम्यान रोहितला स्नायूंचे दुखणे सुरू झाले होते. दुखण्यातून सावरण्यासाठी रोहितने बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत सराव केला. तो फिटनेस चाचणीत उत्तीर्ण झाला तरी कोरोना विलगीकरणाच्या नियमानुसार रोहितला भारतीय संघात खेळण्यास पुढील काही दिवस प्रतीक्षा करावी लागेल. १७ डिसेंबरपासून खेळल्या जाणा-या चारपैकी पहिल्या दोन सामन्यांत तो खेळू शकणार नाही.

१९ नोव्हेंबरपासून येथे सराव करणा-या रोहितने एनसीएत फिटनेस चाचणी उत्तीर्ण केली असून १४ डिसेंबर रोजी तो ऑस्ट्रेलियाकडे रवाना होईल. आयपीएल दरम्यान त्याच्या डाव्या पायाचे स्नायू ताणले गेले होते. एनसीएत त्याने उपचार घेतला. आता वैद्यकीयदृष्ट्या तो निवडीसाठी उपलब्ध आहे, एनसीएतील वैद्यकीय पथक रोहितच्या फिटनेसबाबत समाधानी असून त्याला क्षमता वाढविण्यासाठी आणखी मेहनत घ्यावी लागेल ,असे बीसीसीआयच्या सूत्रांनी स्पष्ट केले.

 

मास्टर ब्लास्टर ‘तेंडुलकरच्या’नावाने बनणार स्टेडियम

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या