34.3 C
Latur
Tuesday, April 20, 2021
Homeक्रीडाविराटपेक्षा रोहितच लय भारी

विराटपेक्षा रोहितच लय भारी

एकमत ऑनलाईन

मुंबई : सध्या भारत आणि इंग्लंडमधे चालू असलेल्या टी-२० मालिकेत भारताने बरोबरी साधली आहे . चौथ्या सामन्यात भारताच्या हातून सामना निसटत चालला असं वाटत असताना भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्माकडे टीमची सूत्र आल्यावर त्याने शार्दुलला दिलेलं षटक आणि भारताला मिळालेल्या दोन विकेट्सने संपुर्ण सामना भारताकडे झुकला.

भारताने दिलेल्या १८६ धावांचा पाठलाग करताना इंग्लंड संघाची सुरूवात निराशाजनक झाली. मात्र त्यानंतर बेअस्टो आणि स्टोक्स यांनी केलेल्या महत्त्वपुर्ण भागिदारीमुळे सामन्याचे चित्र बदलू लागले होते. शेवटच्या चार षटकांमध्ये इग्लंडला ४६ धावांची गरज होती. त्यावेळी कर्णधार विराट कोहली दुखापत झाल्याने बाहेर बसला होता.

विराट बाहेर बसल्यावर टीमची सूत्र रोहित शर्माकडे आलीत. रोहितने शार्दुलकडे चेंडू सोपवला आणि शार्दुलनेही त्याचा निर्णय योग्य ठरवत दोन चेंडूत स्टोक्स आणि इंग्लंडच्या कर्णधाराला माघारी धाडले. सामना भारताच्या झुकला असे वाटत असताना आर्चर आणि जॉर्डन यांनी चौकार आणि षटकार मारत धावसंख्या वाढवली. अखेरच्या षटकात पुन्हा शार्दुल गोलंदाजी करत होता. मात्र त्याच्या पहिल्या तीन चेंडूत ११ धावा आल्या आणि त्यावेळी त्याने दोन वाईड बॉल टाकले.

दरम्यान, शार्दुल त्यावेळी दबावात होता मात्र रोहित शर्माने त्याचाजवळ जात त्याला कानमंत्र दिला. उर्वरित ३ चेंडू शार्दुलने आपली चमक दाखवली. त्यानंतर त्यावे एकच धाव दिली आणि भारताचा विजय नोंदवला. मात्र रोहितने दाखवलेला संयम आणि चोखपणे सांभाळलेल्या जबाबदारीमुळे टी-२० फॉरमॅटचे कर्णधारपद त्याच्याकडे देण्याची मागणी क्रिकेटप्रेमींमधून होत आहे.

बीड डीसीसी निवडणुकीतून भाजपची माघार; पंकजा मुंडेंचा निर्णय

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,478FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या