23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeक्रीडासचिन झाला भावूक; सांगितला ढसाढसा रडायचा किस्सा

सचिन झाला भावूक; सांगितला ढसाढसा रडायचा किस्सा

एकमत ऑनलाईन

मुंबई : जगातील महान फलंदाजांपैकी एक मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसाठी खेळपट्टीवर असे काही क्षण आले ज्याने तो भावूक झाला. २०११ चा एकदिवसीय विश्वचषक जिंकल्यानंतर सचिन भावूक झाला होता. त्यानंत आता पीवायसी क्लबच्या मैदानावरचा किस्सा सांगत सचिन पुन्हा भावूक झाला. सचिन आपले अनुभव चाहत्यांसोबत शेअर करत असाच एक किस्सा इंस्टाग्राम हँडलवर सोशल मीडियावर शेअर केला आहे.

सचिन या व्हिडिओमध्ये म्हणाला की, मी पीवायसी क्लबच्या मैदानात उभा आहे. येथे मी १९८६ मध्ये माझा पहिला अंडर-१५ सामना खेळला होता. त्या सामन्यात मी नॉन स्ट्रायकर एंडवर उभा होतो. माझ्याच शाळेतील मित्र राहुल हा स्ट्रायकर होता. त्याने ऑफला शॉट खेळला आणि धाव घेण्यासाठी धावतो.

तिसरी धाव घेण्यासाठी त्याने माझ्यावर दबाव आणला. मला त्याची वेगवान धावण्याची क्षमता माहित होती, पण पुढे धावण्याचे धाडस माझ्यात नव्हते. त्याच्या सांगण्यावरून मी पळालो पण धावबाद झालो.

खेळपट्टीवरून पॅव्हेलियनमध्ये जाताणा रडत रडत गेलो. यानंतर काही वरिष्ठ खेळाडू आणि मुंबई संघाचे व्यवस्थापक अब्दुल इस्माईल यांनी मला समजावून सांगितले. आता मी ३५ वर्षांनी या मैदानावर परतलो आहे आणि हे मैदान पाहून मी भावूक झालो.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या