मुंबई : क्रिकेटचा देव मानला जाणारा सचिन तेंडुलकर सध्या ‘कायाकिंग’ हा नवा खेळ शिकत आहे. त्याने स्वत:च्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून व्हीडीओ शेअर करत माहिती दिली आहे. तर आता वयाच्या पन्नाशीत सचिन कोणता खेळ खेळतोय असा सवाल नेटक-यांनी केला आहे. त्याचा हा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
दरम्यान, सचिन तेंडुलकर सध्या थायलंडमध्ये आहे. तो सध्या कायाकिंग या खेळाचा सराव करत असून त्याने सांगितले की, हा खेळ बरोबर रिव्हर्स स्विंगसारखा आहे. जुन्या चेंडूला वळवण्याच्या कलेला रिव्हर्स स्विंग असे म्हणतात.
सचिन तेंडुलकरने २०१३ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. तो सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतो. सध्या तो ४९ वर्षांचा असून त्याने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. त्यामध्ये तो एक नवा खेळ शिकण्याचा सराव करताना दिसत आहे.
कायाकिंग हा एक प्रकारचा पाण्यातील खेळ आहे. ज्यामध्ये चप्पूवर (छोटी नाव) बसून पाण्यातील अंतर पार करून दुस-या बाजूला जावे लागते.