नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने खेळाडूंच्या निवड प्रक्रियेवर सडेतोड प्रतिक्रिया दिली आहे. सध्या कोणत्याही खेळाडूला सामना खेळण्यासाठी यो-यो टेस्ट पास होणे अनिवार्य करण्यात आले आहे. ही टेस्ट खेळाडूच्या फिटनेस संबंधित आहे. मात्र, फिटनेसपेक्षा टॅलेंट जास्त गरजेचे आहे, असे सेहवाग ‘क्रिकबज’सोबत बोलताना म्हणाला. त्याचबरोबर यो-यो टेस्ट आधी असती तर सचिन तेंडुलकर, लक्ष्मण आणि गांगुली कधीच पास झाले नसते, असेही सेहवाग म्हणाला़
सेहवाग नेमकं काय म्हणाला?
यो-यो टेस्ट पास न झाल्यामुळे कदाचित अश्विन आणि चक्रवर्ती यांना आंतरराष्ट्रीय सामना खेळता येत नाही. पण मी या गोष्टींना मानत नाही. टीममध्ये खेळाडूंच्या निवडबाबत अशाच प्रकारचे निकष असले असते तर सचिन, गांगुली आणि लक्ष्मण कधीच पास झाले असते. मी स्वत: या तीनही दिग्गजांना बीप टेस्टमध्ये पास होताना नाही बघितले. बीप टेस्टमध्ये १२.५ गुण गरजेचे होते. पण सचिन, गांगुली आणि लक्ष्मण १० किंवा ११ गुण आणायचे. मात्र, या खेळाडूंची स्कील चांगली होती, असे सेहवागने सांगितले.
मला वाटते फिटनेसपेक्षा स्कील जास्त जरुरीची आहे. जर तुमची टीम फिट आहे आणि तुम्ही मॅच हारत असाल, खेळाडूंमध्ये स्कीलची कमी असेल तर व्यर्थ आहे. याशिवाय ते चुकीचे आहे. जे चांगली फलंदाजी आणि गोलंदाजी करतात त्यांना खेळवायला हवे. कारण असेच खेळाडू कठीण काळात चांगली कामगिरी करुन दाखवू शकतात. याशिवाय असे खेळाडू फिल्डिंगसाठी देखील फीट असतात. त्याचबरोबर खेळाडूची फिटनेस हळूहळू चांगली करता येऊ शकते, अशी प्रतिक्रिया सेहवागने दिली.
सेहवागच्या मुद्याला अजय जडेजाचे समर्थन
वीरेंद्र सेहवागचा या मुद्याचे माजी क्रिकेटपटू अजय जडेजाने देखील समर्थन केले. जर तुम्ही स्वयंपाकी शोधत आहात तर तुम्ही त्याचे स्वयंपाकाचे कौशल्य बघाल. तुम्ही त्याला आधी धावायला सांगणार नाहीत. टॅलेंट हेच जास्त जरुरीचे आहे, असे जडेजा म्हणाला़
आरोपी बोठे पुन्हा पोलिसांच्या ताब्यात