21.4 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeक्रीडासचिन तेंडुलकरने आपल्या घरी फडकावला तिरंगा

सचिन तेंडुलकरने आपल्या घरी फडकावला तिरंगा

एकमत ऑनलाईन

मुंबई : भारत स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहे. यानिमित्ताने नरेंद्र मोदी सरकारने ‘हर घर तिरंगा’ अभियान सुरू केले आहे. या मोहिमेअंतर्गत १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान सर्व देशवासी आपापल्या घरी तिरंगा लावत आहेत. भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरही स्वातंत्र्याच्या या अमृतमहोत्सवात सामील झाला आहे. सचिन तेंडुलकरने आपल्या घरी तिरंगा फडकवला आहे.

सचिनने ट्विटरवर याचा एक व्हीडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो घराच्या बाल्कनीत तिरंगा लावताना दिसत आहे. या व्हीडीओसोबत सचिन म्हणाला, तिरंगा नेहमीच माझ्या हृदयात आहे, आज मी माझ्या घरीही तिरंगा फडकावणार आहे. पुढे तिरंगा लावत सचिन तेंडुलकर म्हणतो, ‘हृदयात तिरंगा, घराघरांत तिरंगा, जय हिंद.’

भारताचा ७५ वा स्वातंत्र्यदिन साजरा करणारा सचिन तेंडुलकर हा एकमेव भारतीय खेळाडू नाही. इरफान पठाणसह इतर खेळाडूंनीही पोस्ट शेअर केल्या आहेत.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या