24.7 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeक्रीडासचिनच्या दमदार २० चेंडूत ४० धावा

सचिनच्या दमदार २० चेंडूत ४० धावा

एकमत ऑनलाईन

डेहरादून : सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया लेजेंड्सने रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज मॅचमध्ये इंग्लंड लिजेंड्सचा ४० धावांनी पराभव केला. डेहराडूनमध्ये पावसाचा व्यत्यय हा सामना १५-१५ षटकांचा करण्यात आला. सचिन तेंडुलकरच्या संघाने १५ षटकांत पाच गडी गमावून १७० धावा केल्या. यानंतर इंग्लंड लीजेंड्स संघाला सहा विकेट्स गमावून केवळ १३० धावा करता आल्या.

रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजच्या या १४ व्या सामन्यात इंडिया लीजेंड्सची कामगिरी पाहण्यासारखी होती. सचिनने तुफानी खेळी खेळत २० चेंडूवर ४० धावा केल्या. त्याने तीन चौकार आणि अनेक षटकार ठोकले. त्याच वेळी युवराज सिंगने १५ चेंडूवर नाबाद ३१ चे योगदान दिले त्यात एक चौकार आणि तीन षटकार होते. स्टीफन पॅरीने इंग्लंडच्या दिग्गज संघासाठी तीन विकेट घेतले. डेहराडूनच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने धमाकेदार सुरुवात करत ५.३ षटकात ६५ धावा केल्या. सचिन आणि यष्टीरक्षक फलंदाज नमन ओझा यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली.

सहाव्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर ओझाला पॅरीने बाद करून ही भागीदारी मोडीत काढली. सचिन आणि युवीशिवाय युसूफ पठाणनेही प्रेक्षकांचे मनोरंजन केले. त्याने ११ चेंडूत १ चौकार आणि तीन षटकारांसह २७ धावा केल्या. भारताने निर्धारित १५ षटकांत ५ गडी गमावून १७० धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ १५ षटकांत ६ गडी गमावून केवळ १३० धावा करू शकला. यादरम्यान फिल मस्टर्डने सर्वाधिक २९ धावांची खेळी खेळली, तर राजेश पवारने तीन षटकांत १२ धावा देत भारताकडून सर्वाधिक तीन बळी घेतले. या विजयासह भारत गुणतालिकेत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजमध्ये भारत, वेस्ट इंडिज आणि श्रीलंका हे तीन संघ आहेत ज्यांना अद्याप पराभवाचा सामना करावा लागला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या