26.4 C
Latur
Friday, May 20, 2022
Homeक्रीडासानिया मिर्झाने केली निवृत्तीची घोषणा

सानिया मिर्झाने केली निवृत्तीची घोषणा

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियन ओपन २०२२ मध्ये महिला दुहेरीच्या पहिल्या फेरीत पराभूत झाल्यानंतर भारताची लोकप्रिय टेनिसपटू सानिया मिर्झाने बुधवारी तिच्या निवृत्तीची घोषणा केली. मिर्झा आणि तिची युक्रेनियन जोडीदार नादिया किचेनोक यांना तमारा झिदानसेक आणि काजा जुवान यांच्या स्लोव्हेनियन संघाकडून एक तास ३७ मिनिटांत ४-६, ६-७ (५) असा पराभव पत्करावा लागला. सानिया मिश्र दुहेरीत अमेरिकेच्या राजीव रामसोबत खेळणार आहे.

पराभवानंतर सानिया मिर्झाने घोषित केले की, २०२२ हा तिचा दौ-यावरील शेवटचा सीझन असेल आणि तिला तो खरोखर पूर्ण करायचा आहे. हा माझा शेवटचा सीझन असेल हे मी ठरवले आहे. मला हा पूर्ण सीझन खेळायचा आहे. पण तोवर मी टिकेन की नाही माहित नाही, असे सानिया मिर्झाने सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत सांगितले.

मला असे वाटते की माझ्या कमबॅकला जास्त वेळ लागतो आहे. मला वाटते, माझा मुलगा तीन वर्षांचा आहे. मी त्याच्याबरोबर इतका प्रवास करून त्याला धोक्यात आणत आहे, हे मला लक्षात घेतले पाहिजे. माझे शरीर साथ देत नाही. आज माझा गुडघा खरोखरच दुखत होता आणि त्यामुळेच आम्ही हरलो असे मी म्हणत नाही पण मला वाटते की जसजसे माझे वय वाढत आहे तसतसे बरे होण्यास वेळ लागतो आहे, असेही सानिया म्हणाली. सानिया मिर्झा २००३ पासून व्यावसायिक दौ-यावर खेळत आहे आणि टेनिसमध्ये अव्वल स्थानावर खेळत असताना त्याला १९ वर्षे झाली आहेत.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या