18.1 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeक्रीडामॉडेल आयशामुळे सानिया-शोएबच्या नात्यात दुरावा?

मॉडेल आयशामुळे सानिया-शोएबच्या नात्यात दुरावा?

एकमत ऑनलाईन

कराची : भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक यांचा घटस्फोट झाला आहे. हा दावा शोएबच्या जवळच्या मित्राने केला आहे. हा मित्र त्यांच्या मॅनेजमेन्ट टीमचा भाग आहे. त्यांनी म्हटले आहे, मी त्या दोघांच्या घटस्फोटाची पुष्टी करू शकतो, पण यापेक्षा अधिक काही सांगू शकत नाही.

सानिया -शोएबच्या घटस्फोटाचे कारण मॉडल आयशा कमर असल्याचे सांगितले जात आहे.   दरम्यान मॉडेल आयशा कमरसोबतच्या संबंधांविषयी मलिकची एक मुलाखत व्हायरल होत आहे. यामध्ये मलिकने खुलासा केला होता की, फोटोशूटदरम्यान आयशाने मला खूप मदत केली होती.
वास्तविक, २०२१ मध्ये मलिकने आयशासोबत एक बोल्ड फोटोशूट केले होते. आता हे सर्व फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. सानिया आणि शोएबचे लग्न १२ एप्रिल २०१० रोजी हैदराबादमध्ये झाले. दोघांना इजहान नावाचा एक मुलगा आहे. त्याचा जन्म २०१८ मध्ये झाला होता.

शोएब-आयशाचे फोटा व्हायरल
शोएबसोबत मॉडल आयशा उमर आहे. ती एक प्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेत्री आणि यूट्युबर असून सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे. तिने मलिकसह अनेक नियतकालिकांसाठी फोटोशूट केले आहेत. शोएबने फोटोशूटविषयी म्हटले आहे की, मी एक क्रिकेटपटू आहे. मॉडलिंग हे माझे क्षेत्र नाही. या क्षेत्रात आयशाने मला खूप मदत केली आहे. हे फोटो पाहून तुमची पत्नी काय म्हणाली असे शोएबला विचारण्यात आल्यावर तो म्हणाला की सानियाने काहीही प्रतिक्रिया दिली नव्हती.हे फोटो ऑक्टोबर २०२२ मधील आहेत. ओके नावाच्या नियतकालिकासाठी दोघांनी बोल्ड फोटोशूट केले होते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या