18.9 C
Latur
Friday, October 22, 2021
Homeक्रीडासंजू सॅमसनला १२ लाखांचा दंड

संजू सॅमसनला १२ लाखांचा दंड

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : आयपीएलमध्ये मंगळवारी झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्जचा दोन धावांनी पराभव करत निसटता विजय मिळवला. हंगामात पहिल्यांदाच राजस्थान रॉयल्सकडून ही चूक झाली असल्याने आचारसंहितेनुसार सॅमसनला १२ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. आयपीएलमध्ये मंगळवारी झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्जचा दोन धावांनी पराभव करत निसटता विजय मिळवला.

अखेरच्या ओव्हरमध्ये पंजाबला जिंकण्यासाठी फक्त चार धावांची गरज असताना कार्तिक त्यागीने जबरदस्त गोलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला. दरम्यान सामना जिंकूनही राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनला १२ लाखांचा दंड ठोठावण्यात आला. स्लो ओव्हर-रेटमुळे हा दंड ठोठावण्यात आला.

आयपीएलने दिलेल्या माहितीनुसार, २१ सप्टेंबरला पंजाब किंग्जविरोधात झालेल्या सामन्यात स्लो ओव्हर रेटमुळे राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार संजू सॅमसनला दंड ठोठावण्यात आला आहे. या हंगामात पहिल्यांदाच राजस्थान रॉयल्सकडून ही चूक झाली असल्याने आचारसंहितेनुसार सॅमसनला १२ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या