23.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeक्रीडासर्फराजचा मोठा विक्रम

सर्फराजचा मोठा विक्रम

एकमत ऑनलाईन

मुंबई : मुंबईचा मधल्या फळीतील फलंदाज सर्फराज खानने रणजी ट्रॉफी स्पर्धात शतकांचा रतीबच घातला आहे. आता बाद फेरीत देखील सर्फरातचा हा स्वप्नवत प्रवास सुरूच आहे. रणजी ट्रॉफी २०२२ च्या उपांत्यपूर्व फेरीत उत्तराखंड विरूद्धच्या सामन्यात त्याने शतकी खेळी केली.

सर्फराजने १४० चेंडूत ११ चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने शतकी मजल मारली. याचबरोबर सर्फराज खान यंदाच्या रणजी हंगामातील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज देखील ठरला आहे. या हंगामात त्याने आतापर्यंत ६०० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. सर्फराजने प्रथम श्रेणी क्रिकेटमधील आपले सातवे शतक साजरे केले. तो १५३ धावांची विक्रमी खेळी करून बाद झाला.

याचबरोबर सर्फराज खान आपल्या प्रथम श्रेणीमधील पहिल्या सात शतकी खेळीदरम्यान, १५० धावांचा टप्पा पार केला आहे. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला आहे. रणजी ट्रॉफीमधील आपल्या गेल्या १३ डावात त्याने सहा शतक झळकावले आहेत. यात एक त्रिशतक, ३ द्विशतके, पाचवेळा १५० पेक्षा जास्त धावा आणि 3 अर्धशतके यांचा समावेश आहे. रणजी ट्रॉफी २०२२ मध्ये त्याने आतापर्यंत २७५, ६३, ४८, १६५, १५३ धावा केल्या आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या