26.9 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeक्रीडाछत्तीसगढची सरशी

छत्तीसगढची सरशी

एकमत ऑनलाईन

परभणी : पश्चिम विभागीय आंतरराज्य बॅडंिमटन स्पर्धेतील १९ वर्षाआतील गटात छत्तीसगढची सरशी राहिली तर महाराष्ट्राच्या खेळाडूंनीही निकराची झुंज दिलीÞ पाच गटातील सामन्यात तीन गटात छत्तीसगढने विजय मिळविला तर दोन गटात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी बाजी मारली.

परभणी येथील बॅडंिमटन कोर्टवर सुरू असलेल्या स्पर्धेत महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गोवा, गुजरात व छत्तीसगढ या पाच राज्यातील स्पर्धेक सहभाग झाली होतीÞ बुधवारी झालेल्या सामन्यात गोवा राज्याला तिन्ही गटात पराभवाचा सामना करावा लागलाÞ तर महाराष्ट्र व छत्तीसगढच्या स्पर्धकांनी नेत्रदिपक कामगिरी करीत अंतिम सामन्यात मजल मारली. गुरूवारी सकाळी अंतीम सामने खेळविण्यात आलेÞ यात १९ वर्षाआतील पुरूष एकेरीमध्ये महाराष्ट्राच्या सुविर प्रधान याचा छत्तीसगढच्या रौनक चौहाण याने १३-२१, २१-११, १८-२१ च्या फरकाने पराभव केलाÞ तर महिला एकेरी गटात महाराष्ट्राच्या रिया हब हीने छत्तीसगढच्या तानो चंद्रा हीचा २१-१७, २१-१३ च्या फरकाने पराभव केलाÞ पुरूष दुहेरी गटात आर्य ठाकुर व ध्रुव ठाकुर यांनी छत्तीसगढच्या एÞव्हीÞ अभिषेक व प्रभुजीत सिंग छाब्रा यांचा दणदणीत पराभव केला

तर महिला दुहेरी गटात महराष्ट्राच्या आरती चौगुले व साद धर्माधिकारी यांचा छत्तीसगढच्या हिरल चौहाण व तानो चंद्रा यांनी सरळ सेटमध्ये पराभव केलाÞ तर मिश्र दुहेरी गटात महाराष्ट्राच्या आर्य ठाकुर व महेक नायक यांच्यावर एमÞव्हीÞ अभिषेक व आर शिवानी पिल्लई यांनी मोठ्या फरकाने विजयी मिळविला. दरम्यान १९ वर्षाआतील गटात छत्तीसगढ सरस ठरला आहे. तर महाराष्ट्र संघाने निकराची झुंज दिली. स्पर्धेत पंचप्रमुख म्हणून डॉ. सतिश मल्या, स्पर्धा नियंत्रक म्हणून मिहीर रातंजनकर, सहपंच प्रमुख म्हणून सचिन भारती आदी काम पाहात आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या