23.8 C
Latur
Saturday, September 25, 2021
Homeक्रीडामँचेस्टर रद्द झाल्यानंतर शास्त्रींची प्रतिक्रिया!

मँचेस्टर रद्द झाल्यानंतर शास्त्रींची प्रतिक्रिया!

एकमत ऑनलाईन

मुंबई : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातीस मँचेस्टर टेस्ट रद्द होण्यासाठी कोच रवी शास्त्री यांना जबाबदार धरलं जात आहे. इंग्लिश मीडिया, इसीबी तसंच भारतीय क्रितेट फॅन्स देखील यासाठी शास्त्रींना दोषी मानत आहेत. आता शास्त्रींनी प्रश्नावरील मौन सोडलं असून आपल्यावरील आरोप फेटाळले आहेत. टीम इंडियात झालेल्या कोरोनाच्या उद्रेकाचा पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाशी काहीही संबंध नव्हता, असं शास्त्रींनी स्पष्ट केले आहे. लंडनमध्ये १ सप्टेंबर रोजी रवी शास्त्री यांच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमामुळे शास्त्री कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याचे मानले जात आहे.

‘संपूर्ण ब्रिटन देश सध्या ओपन आहे. पहिल्या टेस्टपासूनच काहीही होऊ शकलं असतं. त्यामुळे पुस्तक प्रकाशन कार्यक्रमामुळे कोरोनाची लागण झाली आणि टेस्ट रद्द करावी लागली, हे खरं नाही.’ अशी प्रतिक्रिया शास्त्री यांनी दिली आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या